Sunday, August 22, 2021

प्रयत्ने वाळूचे कण रगडीता तेलही गळे!!

यावर्षीच्या ऑलिंपिक खेळांची नशा आता उतरलेली आहे. परंतु मला तुम्हाला इथे बेल्जियमच्या पुरुष हॉकी संघाला सुवर्णपदक कसे मिळाले? याबद्दलची कथा सांगायची आहे.

याची सुरुवात 2005 मध्ये झाली ज्यावेळी तेथील हॉकी फेडरेशनचे प्रमुख म्हणून 'मार्क कुड्रोन' यांनी जबाबदारी घेतली. एक ध्येयवेडा असा तो माणूस होता आणि त्याचं ध्येय होतं की आपला संघ हा जिंकायला पाहिजे. त्यासाठी कितीही वेळ लागला तरी चालेल आणि ते खरोखरच आव्हान होते. कारण 1970 नंतर ते कधीही ऑलिम्पिकमध्ये गेले नव्हते आणि जिंकण्याचा तर दूरदूर पर्यंत संबंधच नव्हता, त्यामुळे त्यांना शून्यापासून सुरुवात करायची होती.

जरी त्यांचा वरिष्ठ खेळाडूंचा राष्ट्रीय फुटबॉल संघ तितकासा दमदार नव्हता तरी पुढील वयोगटातील क्लबमध्ये खेळायला येणार्‍या मुलांवर बर्‍याच मोठ्या प्रमाणात आशा होती. तशीही हॉकीकडून तिथे  कोणतीही मोठी अपेक्षा नव्हती, इतकेच नव्हे तर हॉकीमध्ये करियर करू इच्छिणारी बेल्जियममधली तरुण मुलं ही डच हॉकी खेळाडू 'टेऊन दे नुजीयर' चे पोस्टर्स लावून त्याला आदर्श मानत होते. कारण बेल्जियमकडे असे कोणीही नव्हते ज्याला ते आपला आदर्श मानून त्याच्या पावलावर पाऊल ठेवून पुढे जाऊ शकतील.
दुसरीकडे वरिष्ठ राष्ट्रीय संघाला जेव्हा केव्हा नेदरलँड किंवा त्यांच्या शेजारी प्रदेशांसोबत आणि हॉकीतील मोठ्या संघांसोबत खेळायची वेळ यायची त्यावेळी ते नेहमी स्वतःला कमजोर समजत असे.

ही त्यावेळची परिस्थिती होती, ज्यावेळी कुड्रोन यांनी या संघामध्ये एंट्री घेतलेली होती. खरं सांगायचं म्हणजे हॉकी मध्ये आपल्या संघाला जिंकविण्याचं स्वप्न बघण्याचा सुद्धा त्यांना अधिकार नव्हता कारण परिस्थितीच तशी होती. परंतु कुड्रोनला विश्वास होता की, त्यांच्याकडे 'दैवीशक्ती' असल्यासारखी एक तीन टप्प्याची योजना आहे, ज्यातून 2016 पर्यंत देशातील हॉकीमध्ये  वाढीव सुधारणा करण्यास मदत मिळेल आणि मग या खेळामध्ये मेडल मिळवता येईल.

या योजनेचा पहिला टप्पा म्हणजे 'बी-गोल्ड'ची सुरुवात करणे. (हे अजूनही तिथे अस्तीत्वात आहे) आता बी-गोल्ड म्हणजे काय? तर आधी अशा तरुण खेळाडूंना शोधणे, ज्यांच्यामध्ये कौशल्य आहे. त्यानंतर त्यांना या प्रणालीत आणणे, त्यांच्यासोबत काम करणे आणि धैर्य ठेवून ते कुणीकडे जातात ते बघणे.

अंडर-16 युरोपियन चॅम्पियनशिप झाल्यावर त्यांनी जॉन-जॉन डोमेन, थॉमस ब्रियल्स आणि फिलीक्स डेनियर यांच्यासोबतच आणखी काही लोकांना 'विशेष कौशल्य' असलेले खेळाडू म्हणून शोधून काढले.
ही बेल्जियम ची पहिली (सुवर्ण पिढी) 'गोल्डन जनरेशन' होती आणि हे सर्व 2021 मध्ये ऑलम्पिक खेळलेले आहेत. पण कुड्रोनला लढण्यासाठी आणखी एक समस्या होती, ज्याचा त्याला सामना करायचा होता.
ती म्हणजे जोपर्यंत या खेळाडूंना शिकण्याची संधी देत नाही तोपर्यंत कौशल्य असलेल्या लोकांना शोधून काहीही फायदा नव्हता आणि म्हणून फेडरेशनने निर्णय घेतला की, एका विदेशी व्यक्तीला 'मुख्य कोच' म्हणून नियुक्त करायच.

जेव्हा विचार आला त्यावेळी सुरुवातीलाच याचा विरोध झाला, तरीही कुड्रोन जिंकले. त्यांनी बेल्जियमच्या प्रशिक्षकांकरिता परदेशी लोकांकडून खेळ शिकण्यास मदत मिळण्यासाठी 'प्रशिक्षक विकास कार्यक्रम'ही सुरू केला. परंतु ज्या परदेशी प्रशिक्षकांनी बाजू सांभाळलेली होती त्यांना मूलभूत सिद्धांत सांगण्यात आला की, 'बेल्जियमला अनुकूल होईल अशी दूरदृष्टी विकसित करा. तुम्ही भारतीय दृष्टी किंवा ऑस्ट्रेलियन दृष्टी घेऊन इथे यावे अशी आमची इच्छा नाही'.

आणि या कार्यक्रमाचा पहिला खरा परिणाम समोर आला तो म्हणजे 2007 मध्ये जेव्हा युरोपियन चॅम्पियनशिप झाली. तेव्हा त्यांनी जर्मनीला तिसर्‍या स्थानाच्या सामन्यात नमवून ऑलिंपिकमध्ये आपली पात्रता सिद्ध केली, 1976 नंतर पहिल्यांदाच असं घडलेलं होतं. जेव्हा ते ऑलिम्पिकसाठी पात्र झाले तेव्हापासून मग प्रायोजकांनी त्यांच्यात रुची दाखवण्यास सुरुवात केली. त्यांनी तरुण मुलांच्या पालकांना देखील आश्वासन दिले की, हा एक आधार असलेला कार्यक्रम आहे. ज्यातून तुमचा मुलगा खूप पुढे जाईल आणि त्यामुळे मग अधिक मुलांची या कार्यक्रमासाठी नोंदणी सुरु झाली आणि हेच त्यांचं यश होतं.

त्यांच्या तत्कालीन टेक्निकल डायरेक्टरने असे सांगितले होते की, आपल्या खेळासाठी पैसा तेव्हाच येतो जेव्हा तुम्ही त्यामध्ये यश संपादित करीत जाता! त्याच्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही.

बीजिंगमध्ये नवव्या स्थानावर त्यांना समाधान मानावे लागले, परंतु हे स्थान गुंतवणुकीसाठी खूप लहान होते त्यामुळे 'बी-गोल्ड कार्यक्रम' या पार्श्वभूमीवर थोडा अडगळीत टाकल्या गेला आणि ही तीच वेळ होती ज्यावेळेस मशाल तेवत ठेवणे आवश्यक होते.

आता ओलंपिकमध्ये जाने (लंडनच्या बाबतीत) हे काही स्वप्न राहिलेले नव्हते, ती आता फक्त एक छोटीशी गोष्ट होती. त्यांनी हॉकीमध्ये हुशार असलेले एक व्यक्तिमत्व संघ प्रशिक्षक म्हणून नेमले, ज्यांचे नाव 'कॉलिंन बॅच' होते. (योगायोग बघा याच संघाने कॉलिन बॅच यांच्या ऑस्ट्रेलिया संघाला सुवर्णपदकासाठी 2021 मध्ये हरविले आहे)

कॉलिंन बॅचने प्रशिक्षक म्हणून त्यावेळी त्यांच्यासाठी सर्वात मोठे असलेले मेडल मिळवून देण्यास मदत केली आणि  2011 च्या चॅम्पियन चॅलेंजमध्ये त्यांना सुवर्ण पदक प्राप्त झाले. सोबतच फायनल मध्ये दुसरा संघ कोणता होता माहिती आहे ? तो होता भारत! लंडन ऑलिंपिकमध्ये बेल्जियम हे पाचव्या क्रमांकावर होते.

बी-गोल्ड अजूनही बंद करण्यात आलेले नव्हते आणि तीच त्यांच्यासाठी यशाची किल्ली झाली. त्यातून त्यांनी मग कौशल्य असलेली दुसर्‍या टप्प्याची 'गोल्डन जनरेशन' (सुवर्ण पिढी) शोधून काढली. ज्याचे नेतृत्व आर्थर वॅन डोरेन आणि फ्लोरेंट वॅन ओबेल यांनी केलं. वॅन डोरेन हा तो खेळाडू होता ज्याने 2017 आणि 2018 अशी सलग दोन वर्ष 'वर्ल्ड प्लेअर ऑफ द इयर' हा पुरस्कार प्राप्त केला होता. एका मुलाखतीत त्याला प्रश्न विचारण्यात आला की, 'तु हॉकीचा रोनाल्डो आहेस का?'

2014 च्या वर्ल्डकपमध्ये ते पाचव्या स्थानावर होते. हे आजपर्यंतच्या सर्वात वरच्या टप्प्यावरचे हे स्थान होते आणि हे अविश्वासनिय होतं. कारण ज्यावेळी त्यांच्या देशाची या खेळातली भावना संपत होती, त्यावेळी ते या स्थानावर पोहोचले होते.

आता पालकांना पटवून देण्याची गरज पडत नव्हती आणि तरुण खेळाडूसुद्धा 'टॉम बून' याचे पोस्टर आपल्या खोलीत लावून वाढायला लागली होती. (पहिल्या गोल्डन जनरेशन मध्ये भेटलेला होता) लोकांची यामधली आवड, उत्कंठा वाढीस लागली. वृत्तपत्रांमध्ये त्यांच्याबद्दलच्या बातम्या यायला लागल्या, वेगवेगळ्या हॉकी क्लब मधल्या सभासद नोंदणीसुद्धा वाढायला लागल्या, युरोपमधल्या विविध क्लब्सला आता बेल्जियमचे खेळाडू आपल्या टीममध्ये पाहिजे होते आणि आता खरोखरच आंतरराष्ट्रीय हॉकीकडे एक नवीन संघ निर्माण झाला होता. जो परंपरागतपणे त्या खेळात बलाढ्य असलेल्या संघांना टक्कर देऊ शकत होता. (जर्मनी, नेदरलॅंड, ऑस्ट्रेलिया)

2015 ची 'वर्ल्ड लीग फायनल' ही रायपुरमध्ये आयोजित करण्यात आली होती आणि मी तिथे उपस्थित होतो. आणि ही पूर्ण कथा मला संभाषणादरम्यान त्यांच्या टेक्निकल डायरेक्टरने सांगितलेली आहे आणि हो त्यांचा टेक्निकल डायरेक्टर हा 'डच' व्यक्ती होता.

ऑलिंपिकच्या सात महिन्यापूर्वी बेल्जियमच्या संघाला दहा दिवसीय सामन्यांमध्ये संधी मिळाली, ज्यातून त्यांना हे दाखवता आलं की ते सर्वोच्च स्थानी असलेल्या आठ संघांना लढत देऊ शकतात. त्यांनी अर्जेंटिना आणि भारत या दोघांनाही हरवलं आणि भारतासह खेळलेल्या या महत्वपूर्ण मॅचेसमध्ये ते एकदाही हरलेले नाही. तेव्हाच ते द्वितीय क्रमवारीत आले आणि शेवटी ऑस्ट्रेलियासह फायनलमध्ये हरले.

सात महिन्यानंतर त्यांनी शोधलेल्या दोन 'गोल्डन जनरेशन' मधील (सुवर्ण पिढीतील) खेळाडूंना एकत्र करून डब्ल्यू डब्ल्यू -2  ऑलिंपिकची फायनल त्यांनी खेळवली आणि त्यांना सिल्वर मिळाले आणि त्यांचे अकरा वर्षांपासून उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण झाले. कुड्रोनने  जे ध्येय ठेवलं होतं ते त्याने पूर्ण केलं. की अजून पूर्ण झालेले नव्हते?

त्याने नवीन ध्येयं हाती घेतले, ते म्हणजे 2024 पर्यन्त विश्व, यूरोपियन आणि ऑलिंपिक चॅम्पियन बनण्याचे.
कुड्रोनला आता आपल्या संघावर अफाट विश्वास होता, त्यामुळे त्याने हे लक्ष पुढील 8 वर्षात काबिज करणार हे 'ऑन रेकॉर्ड' सांगितलेले. 

फूटबॉलकडे एडन हजार्ड, विनसेंट कॉम्पनी, रोमेलू लोकाकू आणि गर्भश्रीमंत लोकांचे असलेले पाठबळ होते, सोबतच जनतेचा मोठ्या प्रमाणावर असलेला पाठिंबासुद्धा होता, तर त्याउलट हॉकीची अवस्था होती. तरीही त्यात सुदैवाने बी-गोल्ड ला आणखी काही चांगले खेळाडू सापडले ज्यामध्ये, अण्टोईन किना, विक्टर वेगनेज आणि दी स्लूवर होते. दहा वर्षात आता ही तिसरी पिढी सापडलेली होती. 

आता 'ती' वेळ आलेली होती!! त्यामुळे एक गोल्डन जनरेशन डोहमॅन, दुसरी वॅन डोरेन आणि तिसरी किनाच्या नेतृत्वात!! तिन्ही गोल्डन जनरेशनला एकत्रित करून त्यांनी आपले गाठण्यास सुरुवात केली आणि ते ऑलिंपिक चॅम्पियन झाले 2021 मध्ये, यूरोपियन चॅम्पियन झाले 2019 ला आणि वर्ल्ड चॅम्पियन झाले 2018 ला, म्हणजेच त्यांनी ठरविलेल्या डेडलाइनच्या (2024) तीन वर्ष आधीच!!

मागील पाच वर्षात त्यांचाच एकुलता एक पुरुष हॉकी संघ आहे, ज्यांनी वर्ल्डकपमध्ये मेडल्स मिळविलेले आहेत आणि सोबतच दोन-दोन ऑलिंपिकमध्ये सुद्धा. 

आता तुमच्या लक्षात आले असेलच की, अशाच प्रकारे तुम्ही आपल्या संघाला ध्येयवेडे बनवू शकता!! आपल्या संघाला तुम्हाला विश्वास दाखवावा लागतो, त्यांना स्वप्न दाखवावी लागतात आणि त्यातून विजय तुमचाच होतो.
जेव्हा ते जिंकून परत आपल्या देशात गेले तेव्हा त्यांच्या देशातील कितीतरी मुलांना त्यांच्या परिवारांना त्यांनी या खेळात येण्यासाठी उद्युक्त केले असेल? याची कल्पनाच करवत नाही.

असच आपल्याकडेही काहीतरी व्हावं, हीच अपेक्षा!!!

धन्यवाद!!
पवनWriting hand

टीप: :  स्वरूप स्वामिनाथन यांच्या इंग्रजी लेखावरून मराठी वाचकांसाठी!. 



भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...