ही लढाई दोन ही असमान विचार प्रवाहांची, संस्कृतींची आहे. इतिहासात अनेकदा सिद्ध झालेले आहे की, मोठी संख्या, जास्त शक्ती, इत्यादी गोष्टी तुमच्याकडे असल्या तरीही, लढाईत विजय मिळवण्याची हमी देत नाहीत. परंतु, बहुतेक वेळा गर्विष्टपणा आणि अहंकार हा पराक्रमीतल्या पराक्रमी लोकांच्या पतनास कारणीभूत ठरलेला आहे.
एका शक्तीने हिंदूंमध्ये चेतना आणि विश्वास जागृत करून, प्रचंड बहुमताने 'हिंदुस्थान'मध्ये मे 2014 ला पुन्हा एकदा आपली सत्ता स्थापित झाली, ती शक्ति आणि व्यक्ति होती - 'नरेंद्र दामोधरदास मोदी'.
ज्यांना अजूनही या घटनेचे महत्व कळले नसेल आणि मी नक्की काय म्हणतोय हे समजले नसेल, त्यांच्यासाठी पुन्हा अधिक विस्तृतपणे स्पष्ट करतो, "550+ वर्षांच्या 'परकीय' राजवटीतून 'मे 2014' मध्ये स्वतंत्र झालो."
या परकीय राजवटीची मागील 65 वर्षे ही अत्यंत खडतर होती, आणि त्यातील 2004 ते 2014 या कालखंडातील धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक, नैतिक अधःपतन आणि पैशाचे घोटाळे व अर्थव्यवस्थेची केलेली नागडी अवस्था बघितली, तर त्याला एक 'काळा अध्याय' च म्हणावे लागेल. मुल्ले, कम्युनिस्ट आणि मिशनरी यांची पावरफुल असलेली लॉबी, आणि भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या, कुठलीही नैतिकता शिल्लक नसलेल्या, कोंग्रेसच्या मदतीने हिंदुस्थानातील बहुसंख्य असलेल्या हिंदूंना आपल्या पायाखाली दिवसेंदिवस चिरडून टाकत होती. हिंदुत्वाला मातीत मिळविण्यासाठी, बदनाम करण्यासाठी, त्यांनी भारताच्या राष्ट्रीय सुरक्षेसोबत तडजोड करून देशातील जनतेच्या जीव सुद्धा धोक्यात घातला.
राष्ट्रीय पटलावर 'नमो' च्या आगमनाने आणि 2019 मध्ये 2014 पेक्षाही जास्त प्रचंडपणे मिळालेल्या बहुमताने विरोधकांची दाणादाण उडवली. कारण, त्यांना इतका मोठा काळ विरोधात बसायची सवय नव्हती. आजघडीला 'नमो' इतक्या उंच क्षितिजावर आहेत, जिथे पोहोचू शकणारा सध्यातरी दूर दूरपर्यंत कोणीही दिसत नाही.
परंतु, इतिहासात असेही संदर्भ सापडतात, ज्यामध्ये सत्ता मिळाल्यावर आपण एकजुटीने न राहू शकल्याने अजिंक्य असलेली जागा सुद्धा कपटी विरोधकाला दिलेली आहे. बरेचदा सत्ता आल्यानंतर पदासाठी/खुर्चीसाठी असलेली चढाओढ ही मतभेदाचे कारण असते, परंतु सध्याच्या घडीला तसे दिसून येत नाही. हिंदुस्तानच्या उज्ज्वल भविष्यासाठी 'नमो' हा एकच पर्याय आहे असे, बहुसंख्य लोक हे खुशीने मानतात आणि थोडे फार नाखुशीने ही मानतात.
बहुधा थोड्याफार प्रमाणात नाखुशीने मानणारा हा तो गट आहे, ज्यांचे समाजमाध्यमावर वर्चस्व आहे आणि तो सरकारकडून असलेल्या त्यांच्या अवास्तव अपेक्षांना बळी पडलेला दिसून येतो. या अवास्तव अपेक्षांचे मूळ हे सरकार सामना करीत असलेल्या अडचणीकडे त्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे दिसून येते किवा मग त्यांच्यात सरकारच्या बाबतीत असलेल्या अतिआत्मविश्वासामध्ये, ज्यामुळे ही गुंतागुंत निर्माण होत आहे.
आपण बरेचदा अतिउत्साहात येतो आणि सरकार आपल्या अपेक्षेप्रमाणे काम करीत नाही, असा विचार करतो. इतकेच कशाला काही लोक तर असेही आहेत, जे पंतप्रधानांना कणा नसलेला म्हणून हिणवितात किवा त्यांना मिळालेल्या 303 खासदारांच्या बहुमतास हिणवितात. परंतु, जस-जशा आपल्या इच्छा-आकांक्षा या सरकारद्वारे पूर्ण होत जातात, तस-तसे आपण विसरत जातो की, 'नमो' हे आपल्या भारत देशाचे पंतप्रधान आहेत आणि आपल्या घरच्या दुकानाचे मालक नाहीत.
आपण आताचेच ताजे उदाहरण बघूया, ज्यामध्ये उदारमतवादी असलेल्या बड्या तंत्रज्ञान कंपन्यांनी भारत सरकारच्या ईलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या नवीन मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्यास नकार दिला.
सूचनांचे पालन करून सर्व बाबी लागू करून घेण्यासाठी देण्यात आलेली मुदत संपली आणि भारत सरकारने या बड्या तंत्रज्ञान कंपन्यांना नोटिस पाठविली की, सूचनांचे पालन करा किवा तुम्हाला 'प्लॅटफॉर्म/माहिती शेयर करू देणारा मध्यस्थ' म्हणून दिलेले (इंटरमिजिएट) संरक्षण काढून घेऊ. जवळपास त्याचवेळी ट्वीटर या समाजमाध्यमाला नायजेरियाने त्यांच्या देशातून हाकलून लावले. कारण, त्यांनी तेथील राष्ट्रपतीचे अकाऊंट ब्लॉक केले होते. लगेच आपण त्या गोष्टीशी साधर्म्य नसतानाही, तुलना करून आपल्याच देशातील सरकारला दूषणे द्यायला सुरुवात केली आणि सोबतच आपल्याच देशाचे पंतप्रधान आणि ईलेक्ट्रोनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाचे मंत्री श्री रविशंकर प्रसादजी यांच्या नावाने बोंब ठोकण्यास सुरुवातही केली.
जर आपण ही बोंबाबोंब करण्यास सुरुवात करण्यापूर्वी थोडा सुक्ष्मपणे विचार केला असता तर आपणास जाणीव झाली असती की, तशा प्रकारच्या कारवाईचे पाऊल जर भारत सरकारने उचलले असते तर ते किती अनर्थकारी ठरले असते आणि जवळजवळ त्या गॅंगला त्यांच्या हातात पाहिजे असलेले आयते कोलीत आपण दिले असते. कारण, त्यांना हेच साध्य करायचे आहे की, 'नरेंद्र मोदी सरकार हे हुकुमशाहीवादी, एकाधिकारवादी, भाषण स्वातंत्र्याचे गळचेपी करणारे, अल्पसंख्यांक विरोधी, इत्यादी असून, तशी प्रतिमा त्यांना त्यांच्याकडे असलेल्या प्रचंड मीडिया संसाधनांचा वापर करून जगासमोर मांडायची आहे. शिवाय यासोबतच ट्वीटरला आपले विकटीम कार्ड खेळण्याची संधी सुद्धा मिळाली असती, ज्यामध्ये आता डाव्यांच्या गॅंगने मास्टरी मिळविलेली आहे.
ट्विटरद्वारे नवीन मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात यावे म्हणून, घेतलेल्या भूमिकेवर ठाम राहून भारत सरकारने ट्विटरला वारंवार स्मरणपत्रे पाठवून त्यांना भारतीय कायद्याच्या चौकटीत काम करण्याची अनेकदा संधी देण्याची प्रामाणिकता दर्शविली.
याचदरम्यान फेसबूक आणि यूट्यूबसारख्या बड्या कंपन्यांनी नवीन मार्गदर्शक सूचनांचे पालन केले आणि ट्वीटरची अवस्था लाजिरवाणी करून टाकली. कारण, त्यांच्या मार्गदर्शक सुचनांच्या पालनामुळे ट्वीटरद्वारे आपल्या सफाईसाठी केलेल्या दाव्यांमधली हवा आपोआप निघून गेली होती आणि सर्वांसमोर स्पष्टपणे दिसून यायला लागले होते की, ट्वीटर जाणीवपूर्वक आडमुठी भूमिका घेत आहे म्हणून. आपण भारत सरकारद्वारे ट्वीटरला वारंवार पाठविलेल्या नोटीसीवर हसत होतो, त्याला कारणीभूत होते, आपले या सर्व बाबींकडे होत असलेले दुर्लक्ष आणि त्यात तेल ओतण्याचे काम हे आपला उताविळपणा करीत होताच.
भारत सरकारच्या करारी, दृढनिश्चयी, संयमी पण खंबीरपणे घेतलेल्या भूमिकेमुळे, भारत सरकार आधी नमते घेईल या ट्वीटरच्या अपेक्षेवर विरजण पडले. जागतिकस्तरावर माजोरडेपणा करून अमेरिकेचे तत्कालीन प्रेसिडेंट यांचे खाते बंद करण्याचा उद्धटपणा करणार्या ट्वीटरचे शेवटी भारतात पंख छाटण्यात आले. विचार करा ही, गोष्ट पचविण्यासाठी बिचार्या जॅक डोर्सी आणि त्याच्या कंपनीला (पिलावळीला) किती त्रास झाला असेल.
या गोष्टीमुळे, भारत सरकार हे दोन्ही बाबतीत विजयी स्थितीत होते. कारण, जर ट्वीटरने सूचनांचे पालन करून काम सुरू केले तर सर्व सुरळीत होणार होते आणि या सामन्याचा धावफलक हा भारत सरकार -1 आणि ट्वीटर -0 आणि ट्वीटरने पालन केले नाही तर ट्वीटरचा मध्यस्थ(इंटरमिजिएट) हा दर्जा समाप्त केला जाणार होता, म्हणजे पुन्हा तोच धावफलक राहणार होता, भारत सरकार-1 ट्वीटर -0.
या सर्व घटना घडल्या त्याचे प्रमुख कारण म्हणजे ट्वीटरचा 'मीच राजा असल्याचा अहंकार. सरकारने कठोर पाऊल उचलावे म्हणून मोठ्या प्रमाणावर आक्रोश करीत असलेल्या लोकांना या घटनेचे असलेले प्रचंड महत्व आणि ट्वीटरवर होणारा संभाव्य परिणाम, लक्षात आला नाही. ट्वीटरचे मध्यस्थ म्हणून काढून घेतलेले संरक्षण म्हणजे, यापुढे ट्वीटरवर शेयर केल्या गेलेल्या कोणत्याही चुकीच्या बाबींसाठी ट्वीटर जबाबदार ठरणार होते आणि त्यासाठी दाखल करण्यात आलेल्या केसेस आणि दाव्यांमध्ये ट्वीटरला पार्टी बनविल्या जाऊ शकणार होते.
आणि म्हणतात ना की, 'ज्यावेळी विपरीत बुद्धी सुचते, त्यावेळी विनाशकाळ जवळ आलेला असतो'. लोनी येथील घटनेवरील जुबेर, राणा अय्युब, सबा नकवी आणि त्यांच्या रुदाली गॅंगने पसरविलेल्या फेक न्यूजवर ट्वीटरने 'मेनूपुलटेड मीडिया' हा टॅग लावण्यास दिलेला नकार किंवा दाखविलेली असमर्थता, यामुळे यूपी पोलिसांद्वारे या फेक न्यूज पसरविणार्या गॅंगवर केल्या गेलेल्या एफआयआरमध्ये ट्वीटरचाही समावेश करण्यात आलेला आहे.
भविष्यातील येणारा काळ हा या 'पक्षी' (ट्वीटर) साठी मोठा मनोरंजक असेल, कारण आता कोणताही सामान्य नागरिक किंवा सरकारी संस्था ही ट्वीटरवर केस करू शकते किंवा दावा दाखल करू शकते, ज्याप्रमाणे आपण वरील केसमध्ये बघतोय. आणि हे सर्व शक्य झाले, 'ट्वीटरला असलेल्या चुकीच्या बाबतीतील घमेंडीमुळे'.
डाव हा अचूकपणे लावण्यात आला, ज्यामुळे एकदम नेमकी आणि हळुवारपणे ट्वीटरला चेक-मेट देता येईल. एकीकडे ट्वीटरच्या डोळ्यावर असलेल्या घमेंड आणि अहंकाराच्या पट्टीमुळे आणि दुसरीकडे भारत सरकारच्या 'श्रद्धा आणि सबुरी'मुळे तो अलगद यात अडकला : 'श्रद्धा' 100 कोटी भारतीयांची आणि 'सबुरी' अढळ असलेल्या कर्मयोगी नरेंद्र मोदीजींची.
हे फक्त एक उदाहरण आहे ज्यातून आपण ही गोष्ट समजून घेऊ शकतो की, आपण आपल्या नेत्याच्या हेतुवर कधीही शंका बाळगू नये. कारण, श्री नरेंद्र मोदीजी हे काही स्वतःच्या स्वार्थासाठी पंतप्रधान झालेले नाहीत तर ते फक्त 'हिंदुस्थान'चे असलेले गतवैभव परत मिळवून देण्यासाठी आणि 550+ वर्षातील केल्या गेलेल्या चुका सुधारण्यासाठी पंतप्रधान झालेले आहेत.
आपला 'सुवर्ण काळ' जेमतेम सुरू झालेला आहे. त्यामुळे उताविळपणा आणि तक्रार करू नका की, आपली वेळ संपत चाललेली आहे, हे तथ्यपूर्ण सत्य नाही. उताविळपणामुळे आपल्याला फक्त संतप्तता येईल आणि संतप्त, चिडचिडे डोक हे तर्कसंगत विचार करू शकत नाही, ते आपल्याला आपल्या नेतृत्वावर अविश्वास करण्याकडे नेतं आणि त्यातून आपण चुकीचे निर्णय घेऊन विरोधकांची मदतच करतो. असे चुकीचे निर्णय हे प्राणघातक किवा अत्युच्य प्रमाणात हानिकारक ठरतात, जे आपण राजस्थान आणि छत्तीसगढ, इत्यादी ठिकाणी बघितलेलेच आहे.
त्यामुळे आपण प्रयत्न केला पाहिजे की, बहुमोल अशा 'श्रद्धा आणि सबुरी' या सिद्धांतासोबत चिकटून कसे राहता येईल. म्हणजेच देवावर आणि आपल्या नेत्यावर 'श्रद्धा' आणि 'सबुरी'ने आपल्या नेत्याद्वारे, केलेली 'कृती आणि बाळगलेले 'मौन', अशा दोन्ही गोष्टींमधून येणार्या अंतिम परिणामांची वाट बघितली पाहिजे.
जय हिंद!!
बेसुरा तानसेन सरांनी मराठीतून त्यांचा लेख अनुवादीत व्हावा, ही अपेक्षा व्यक्त केली आणि लखोबा लोखंडे जी यांनी माझी शिफारस करून विश्वास दाखविला, त्यासाठी दोघांचेही आभार!