Friday, September 10, 2021

साक्षरतेचे केरळ मॉडेल!

परवा जागतिक साक्षरता दिवस साजरा करण्यात आला आणि तो करत असताना मनात विचार आला की, फक्त पुस्तकातून घेतलेले ज्ञान किंवा पास झालेले वर्ग म्हणजेच साक्षरता म्हणायचे काय? कारण जर असे असेल तर 2010 च्या जनगणनेनुसार केरळ हे भारतातील सर्वात साक्षर असलेले राज्य आहे. सोबतच मागच्या वर्षी एन एस ओ द्वारे केल्या गेलेल्या सर्वेमध्ये सुद्धा 96.2% घेऊन पुन्हा एकदा देशात प्रथम क्रमांक पटकावलेले राज्य असलल्याचे आपणास दिसून येईल.

परंतु याच सर्वात जास्त साक्षर असलेल्या राज्यातील तरुण हे आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असलेल्या इसिससारख्या आतंकवादी संघटनांमध्ये सामील होत असल्याचे आपणास दिसून येत आहे.


मग ज्या राज्यात सर्वात जास्त साक्षरता आहे त्या राज्यातील तरुणांना आतंकवादी म्हणून जीवन जगण्याची का हौस बरे आली असेल? याचाच अर्थ असा की, एक तर फक्त शिक्षण घेतले म्हणजे अक्कल येईलच असे नाही किंवा फक्त कागदावर आकडेवारी दाखवण्यासाठी त्या राज्यातील जनता साक्षर दाखविली गेली असेल. यापैकी कोणतेही एक कारण बरोबर असू शकतं.

1 नोव्हेंबर 1956 ला स्थापना झालेल्या या राज्याचा कारभार 1957 च्या निवडणुका पासून कम्युनिस्टांच्या हातात आहे आणि डाव्या विचारसरणीमुळेच आजही केरळ हे इज ऑफ डूइंग बिझनेस मध्ये 2019 नुसार भारतात 28 व्या स्थानावर आहे, यावरुनच या राज्याची औद्योगिक दृष्ट्या होत असलेली वाताहत आपणास दिसून येते. त्यामुळेच मग इथल्या लोकांना अरब देशांमध्ये काम करायला जावं लागतं आणि तेथे गेल्यानंतर विचार परिवर्तन (ब्रेनवॉश) करण्यास माथे भडकविणार्‍या लोकांना सहजच सावज मिळते.

आणखी एक गोष्ट इथे नमूद करावीशी वाटते ही भारतातील सर्वात साक्षर असलेलं हे केरळ राज्य गुन्ह्यामध्ये सुद्धा अव्वल आहे आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही परंतु सत्य हे आहे कि याच गुन्ह्याच्या आकडेवारीत उत्तर प्रदेश आणि झारखंड यांच्यासारखे मागास म्हणून हिणवल्या गेलेले राज्य 26 व्या आणि 30 व्या स्थानावर आहेत.


मग जर या राज्याचे साक्षरतेचे प्रमाण इतक्या मोठ्या प्रमाणावर असूनही साक्षर झालेले लोक धर्मांतरणाकडे किंवा दहशतवादाकडे जात असतील तर नक्कीच साक्षरता आणि समजदारपणा या दोन्हीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही. वरील सर्व बाबींचा विचार केला असता, डाव्यांनी उभे केलेले साक्षरतेचे केरळ मॉडेल किती फसवे आहे? याचा अंदाज येतो. त्यामुळेच आपला ओढा हा साक्षर आणि समजदार बनण्याकडे असला पाहिजे, फक्त पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही!


धन्यवाद!

पवन✍️




भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...