राहुल गांधी सुप्रीम कोर्टात पेगाससवर आपटले, नरेंद्र मोदी जनतेच्या दरबारात पुन्हा झळाळून निघाले.
मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे स्टार प्रचारक श्री राहुल गांधी आणि त्यांच्या नेतृत्वात काँग्रेस तसेच इतर विरोधी पक्षांनी भारतीय संसदेचे कामकाज बंद पाडलेले आहे. ज्यामुळे तुमच्या-आमच्या कररूपी दिल्या गेलेल्या पैशाचा चुराडा करण्याचे काम सुरू आहे. ज्या कारणावरून संसदेचे कामकाज बंद पाडल्या जात आहे, ते कारण म्हणजे 'पेगासस या सॉफ्टवेअर (स्पायवेअर) च्या माध्यमातून सरकार पाळत ठेवत आहे' हा त्यांचा आरोप आहे. सरकार दाद देत नाही म्हणून आणि आपले नाव न्यायालयाच्या पटलावर येऊ नये म्हणून मोठ्या चलाखीने त्यांनी हिंदू ग्रुपचे संचालक, श्री. एन. राम यांच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टात याचिका केलेली आहे आणि त्यांचे वकील म्हणून काँग्रेस नेते आणि ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. हे तेच कपिल सिब्बल आहेत ज्यांनी काँग्रेसच्या काळात सुप्रीम कोर्टात शपथपत्र देऊन सांगितले होते की, हिंदूंचे आराध्य दैवत भगवान श्रीराम हे 'काल्पनिक' आहेत आणि सोबतच वेळोवेळी विविध कारणे देऊन त्यांनी राम मंदिर खटला हा जवळपास 20 वर्षे कोर्टात खेळवत ठेवला.
काल म्हणजेच दिनांक 05 ऑगस्ट 2021 रोजी सर्वोच्च न्यायालयात भारताचे सरन्यायाधीश माननीय श्री एन. व्ही. रमन्ना आणि माननीय न्यायाधीश सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली.
सुनावणी दरम्यान सरन्यायाधीशांनी कोणते प्रश्न विचारले ? आणि त्याचे उत्तर याचिकाकर्ते किंवा त्यांच्या वकिलांनी काय दिले? हे जर बघितले, तर 'पेगासस' वर चाललेला दावा किती पोकळ आहे, हे आपल्या लक्षात येईल.
सुप्रीम कोर्टातील सुनावणीचे वार्तांकन करणार्या पत्रकार नलिनी शर्मा यांनी दिलेल्या वार्तांनाकनानुसार,
माननीय सरन्यायाधीशांनी प्रश्न केला की, 'तुम्ही तुमच्या शपथपत्रात सांगितले आहे की, काही भारतीय पत्रकारांचे नाव या हेरगिरीच्या यादीत आहेत. तर ते तुम्हाला कुठून मिळाले?. कारण शपथपत्रात तुम्ही म्हणता की, कॅलिफोर्निया कोर्टाने त्यांच्या सुनावणीदरम्यान फोन टॅप केल्या गेलेल्या भारतीय पत्रकारांचे नाव घेतलेले आहे, परंतु कॅलिफोर्निया कोर्टाच्या निकालपत्रात याचा कुठेही उल्लेख नाही'.
त्यावर याचिकर्त्यांचे वकील श्री कपिल सिब्बल यांनी उत्तर दिले की, 'याचा उल्लेख कॅलिफोर्निया कोर्टाच्या निकालपत्रात नाही. तुम्ही बरोबर आहात.'
सीजेआय : मग, तुमचे 'वरील' वाक्य चूक आहे!
यावरूनच आपल्या लक्षात आलेले असेल की, शपथपत्रात खोटे बोलून याचिकाकर्ते दावा करीत आहेत की, भारतात पेगाससचा वापर करून हेरगिरी केली गेली.
मग आता हा दावा त्यांनी कशाच्या आधारावर केला? असा प्रश्न आपल्याला पडतो. त्याचे उत्तर खालीलप्रमाणे आहे.
तर उत्तर असे आहे की, ज्याचा उल्लेख भारतात 'कॅलिफोर्निया कोर्ट' म्हणून केल्या जात आहे, तो निकाल हा नॉर्दर्न डिस्ट्रिक्ट ऑफ कॅलिफोर्नियाच्या जिल्हा न्यायालयाने दिलेला आहे. 2019 मध्ये, ज्यावेळी सर्वप्रथम पेगाससचा वाद निर्माण झाला होता त्यावेळी व्हाट्सअपद्वारे कॅलिफोर्नियाच्या कोर्टात याचिका दाखल करण्यात आली की, इस्रायली कंपनी एनएसओ ज्यांनी पेगाससची निर्मिती केलेली आहे, या कंपनीद्वारे व्हाट्सअपच्या माध्यमातून जवळपास 1400 मोबाईल फोन मध्ये मालवेयर सोडण्यात आलेले आहेत. ज्यातून ते फोन हॅक झाले आणि त्याचा वापर नंतर त्या लोकांवर पाळत ठेवण्यासाठी करण्यात आला.
परंतु, ही याचिका 16 जुलैला न्यायालयाने खारीज करून 45 पानांचा निकाल दिलेला आहे. म्हणजेच व्हाट्सअपद्वारे केल्या गेलेला दावा हा खोटा आहे, असे 'त्या' न्यायालयाने निकाल देऊन सांगितले आहे.
परंतु या 45 पानांच्या निकालात कुठेही भारतीय पत्रकारांना पेगासस या सॉफ्टवेअर/स्पायवेअर द्वारे लक्ष्य केल्या गेल्याचा उल्लेख नाही.
मागील वर्षी ही याचिका खारीज करताना न्यायालयाने खालीलप्रमाणे मत प्रदर्शित केलेले आहे.
मग एन.राम यांच्या याचिकेत हा उल्लेख कुठून आला? तर ज्यावेळी त्यांच्या वकिलांशी संपर्क केला गेला तेव्हा त्यांनी सांगितले की, या याचिकेमध्ये दिलेला भारतीय पत्रकारांचा संदर्भ हा 'द गार्डियन' ने कॅलिफोर्निया न्यायालयाच्या निकालावर आधारित प्रकाशित केलेल्या रिपोर्टवर आधारित आहे. त्या रिपोर्टमध्ये 'द गार्डियन' ने सांगितले आहे की, यूके मधील प्रकाशनाने 'सिटीजन लॅब' द्वारे केल्या गेलेल्या संशोधनाचा हवाला दिलेला आहे. ज्यामध्ये दावा करण्यात आला आहे की, त्या लक्ष्य केलेल्या 1400 लोकांमध्ये भारतीय पत्रकार सुद्धा होते.
त्या अहवालातील खालील भाग तुम्हीच वाचा.
आणि अशाप्रकारे काल कोर्टात सरन्यायाधीश एन. व्ही. रमन्ना यांनी विरोधकांना उघडे केले. मराठी मीडिया हे दाखवणार नाही आणि जनतेसमोर सत्य यावे, म्हणून हा प्रपंच.
जाता जाता इतकेच म्हणेन की, भाजपचे स्टार प्रचारक राहूल गांधी हे नेहमीच काहीतरी नवीन पिल्लू घेऊन येतात. जसे, मागील वेळी राफेलचे भूत घेऊन आलेले होते. पण थोड्याच दिवसात त्याची हवा निघून जाते आणि ते तोंडावर आपटतात. कारण, 'दारात नाही आड, म्हणे लावतो झाड' अशी त्यांची अवस्था आहे. परंतू, हे करीत असताना ते नकळतपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा ही जनतेच्या दरबारात आणखी उजळून काढतात. त्यासाठी राहुल गांधी यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. त्यांना शुभेच्छा की, भविष्यातही आपण पुन्हा असेच विषय भारतीय जनतेसमोर आणत राहावे. जेणेकरून जनतेकडून आपोआपच मोदींना भरघोस पाठिंबा मिळत राहील.
धन्यवाद!!
पवन✍️
संदर्भ : बार अँड बेंचद्वारे दिनांक 05 ऑगस्ट 2021 रोजी करण्यात आलेले फॅक्ट-चेक आणि सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीचे वार्तांकन!
छान माहिती दिली आहे.
ReplyDeleteअप्रतिम
ReplyDelete