प्रत्येक संस्कृतीचे निर्माण हे असंख्य शूर माणसांनी दिलेल्या बलिदानावर आणि आणि त्यांच्याद्वारे दिल्या गेलेल्या इतर योगदानावर अवलंबून असते. स्वतःच्या राजकीय फायदयाकरिता धर्मनिरपेक्षतेच्या वसाहतवादी बीजारोपणास मदत करून हिंदूंनी आपल्या पूर्वजांकडून मिळालेल्या विजयी परंपरांचा निर्लज्जपणे अपमान केला. त्यातून बाहेर पडण्याकरिता 2014 च्या निवडणुकीत नरेंद्र दामोधरदास मोदीच्या नावाने हिंदूंना एक आशेचा किरण दिसला. 2014 मध्ये मोदींनी भारताचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर हिंदूंना असा एक नेता मिळाला जो या शक्तींच्या विरोधात काम करणार होता. जरी नरेंद्र मोदी हे भारतीय धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताक पद्धती टिकवून ठेवण्यासाठी काम करत असले तरी ते या शक्तींच्या विरोधात काम करणार होते, यात कोणाचेही दुमत नाही. आज सात वर्षानंतर मोदी सरकारने हिंदू संस्कृती आणि धर्मनिरपेक्ष प्रजासत्ताकासाठी उचललेल्या अपेक्षांच्या ओझ्यातील बरेच हेतू साध्य केलेले आहेत.
लोकांनी त्यांना निवडून देतांना ज्या अपेक्षा ठेवलेल्या होत्या त्या मोदी सरकारने संस्कृतीच्या बाबतीत तरी पूर्ण केलेल्या आहेत/करीत आहेत. एकीकडे डाव्यांकडून मोदींच्यामार्फत हिंदुत्वाचा अजेंडा राबवला जात आहे म्हणून रात्रंदिवस ओरड केली जाते तर दुसरीकडे डावे नसलेले ओरडतात की, आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर निवडणुकीत बहुमत देऊनही अजूनपर्यंत इतक्या वर्षापासून पडीत असलेले हिंदू समाजाचे प्रश्न का सोडविल्या जात नाहीत ?
सुप्रीम कोर्ट हिंदूंच्या बाजूने निकाल द्यायला लागलेले आहे, या गोष्टीवर आता डाव्यांनीसुद्धा विश्वास ठेवायला सुरुवात केली आहे. उदाहरणार्थ राम जन्मभूमी खटला, 370 कलम रद्द आणि इतर. पण सत्य हे आहे की, या सरकारनेच हिंदूंच्या विरोधात असलेले कायदे आणलेले नाहीत किंवा येऊ दिलेले नाहीत. उदाहरणार्थ जातीय हिंसा विधेयक.
सोबतच हे सरकार दिल्लीमध्ये सीएए आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या दंगलीनंतर सुद्धा इस्लामिक शक्तींच्या समोर झुकले नाही, यातूनच तुम्हाला मोदींसाठी हिंदुत्वाचा अजेंडा किती महत्वाचा आहे, हे लक्षात येईल.
दुसरीकडे डावे विचार नसलेल्या लोकांचा असा ठाम विश्वास आहे की, 'एक हात मे कुराण और एक हाथ मे कम्प्युटर' या लोकांचे गालिचेदार टाकून स्वागत केले जाते तर दुसरीकडे गौरक्षा करणार्या लोकांचा धिक्कार केल्या जातो. जेव्हा एखाद्या विशिष्ट धर्माच्या 'चोराला' जमावाद्वारे चोप दिला जातो त्यावेळी सर्वजण आवई उठवतात. परंतु ज्यावेळी हिंदूची दररोज मोठ्या प्रमाणावर काटछाट केली जाते, त्यावेळी तेच आवई उठविणारे गळ्यात मूग गिळून गप्प बसलेले असतात.
डाव्या विचारसरणीचे नसलेले लोक आश्चर्यचकित आहेत की, 'पुजा स्थळ कायदा' अजूनपर्यंत रद्द का करण्यात आला नाही? हिंदूंचे मंदिर मोकळे करण्यासाठी सरकारद्वारे हालचाल का होत नाही ? तसेच सबरीमाला प्रकरणात हिंदू आपल्या आस्थेचे रक्षण करण्यासाठी रस्त्यावर उतरणार होता, त्यावेळी आरएसएसने मत प्रवाहाविरुद्ध वेगळी भूमिका का घेतली? सोबतच ज्यावेळी बंगालमध्ये हिंदूंची कत्तल केल्या जात होती आणि पालघरमध्ये साधूंना जमावाद्वारे ठार केले गेले, त्यावेळी केंद्र सरकारने कोणतीही हालचाल का केली नाही ? अशा अनेक बाबींमुळे त्यांच्याही मनात संशयाचे काहूर माजलेले आहे.
काही प्रकरणांमध्ये इतर अन्य प्रकरणाच्या अडचणींमुळे भाजपातर्फे कठोर भूमिका घेण्यात आली नाही, यात कोणाचेही दुमत नाही आणि त्याच्यासाठी असलेली 'गुढ कारणे' ही त्यांना चांगल्याप्रकारे माहिती असेलच. परंतु भाजपाद्वारे संस्कृतीच्या मुद्यावर सोडलेल्या या पोकळीमुळे काही दळभद्री राजकारण्यांना स्वतःला मार्केटमध्ये 'विराट हिंदू' म्हणून स्थापित करण्याची संधी मिळालेली आहे. जरी त्यांनी भूतकाळात चुकीच्या गोष्टी केल्या आहेत तरीही तेच एकटे हे 'हिंदूंसाठी तारणहार' आहेत, हे दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
'विराट हिंदू' चा मुखवटा घातलेल्या राजकारण्यापैकी एक राजकारणी म्हणजे 'सुब्रमण्यम स्वामी' होय. ज्याने अनेक लोकांचा राजकीय बळी घेतलेला आहे. त्याच्यामते तो ज्या जागेवर पोहोचलेला आहे, तेच उंच शिखर आहे आणि त्या उंच शिखरावर पोहोचण्यासाठी ढोल बडवणे आवश्यक असते. कारण, त्याच्याशिवाय त्याला कोणी विचारणार नाही.
आज स्वतःला 'विराट हिंदू' म्हणवणारा आणि केंद्रात 'हिंदुत्ववादी सरकार' असायला पाहिजे, असं म्हणणारा व्यक्ती अटलबिहारी वाजपेयी यांच्या 1998 मधील सरकारला पाडणारा आहे. इतकेच नव्हे तर स्वामींनी स्वतः वाजपेयी आणि त्यांच्या सहकार्यांची प्रतिमा सुद्धा मलीन केलेली आहे.
20 मार्च 1997 ला त्यांनी लिहिले की, "जपानच्या विदेश मंत्र्यांनी नवी दिल्लीत एक पार्टी आयोजित केली होती ज्यामध्ये अटलबिहारी वाजपेयी भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणून उपस्थित होते आणि मी सुद्धा त्यामध्ये निमंत्रित होतो. मला तेव्हा धक्काच बसला जेव्हा भारताच्या परराष्ट्रमंत्र्यांना मी पूर्णपणे नशेत बघितले."
यासोबतच स्वामी यांच्या 23 मार्च 1998 ला 'आऊटलुक मासिका'त प्रकाशित झालेल्या आणखी प्रतिक्रिया बघूया.
1.'वाजपेयींना मला 'आणीबाणीचा हिरो' ठरविण्यात आलेले होते हे पचविता आले नाही.' सोबतच इंदिरा गांधीसमोर पत्करलेली शरणागती लपविण्याचा स्वामी प्रयत्न करीत होते
2. 'मोरारजीचे सरकार पाडण्यासाठी चरणसिंग यांना दोष दिला जात असला तरी त्यामागचे खरे सूत्रधार आणि दोषी हे रामकृष्ण हेगडे आणि वाजपेयी आहेत. हैराण झालेल्या मोरारजींनी राजीनामा दिला आणि सार्वजनिक जीवनातून संन्यास घेतला. खरतर त्यादिवशी हेगडे आणि वाजपेयी यांनी आपल्या सार्वजनिक जीवनातून संन्यास घ्यायला पाहिजे होता.'
3. 'मोरारजी आणि चरणसिंग हे रामायणातील 'कैकेयी' सारखे आहेत आणि या जनता रामायणात 'शकुनी' ची भूमिका ही वाजपेयींनी निभावलेली आहे'.
त्यावेळी स्वामी काय म्हणायचे? आणि आज ते काय म्हणत आहेत? यातील बर्याच गोष्टीत समानता आहे. त्यावेळी त्यांना वाटायचे की, वाजपेयी त्यांना जळतात. कारण त्यांना आणीबाणीच्या काळातील हिरो समजल्या जात होते आणि ज्याची प्रसिद्धी त्यांना मिळालेली होती आणि आता ते मोदींनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता दाखवावी म्हणून मागणी करतात आणि ते करत असताना मोदींनी त्यांना अर्थमंत्री बनवावं, असंही त्यांना वाटतं. यासोबतच जे मागणी करतोय ते तुम्ही द्या, अन्यथा.......!! असा त्यांच्या मागणीचा होरा आहे.
परंतु ते विसरून जातात की, त्यावेळी त्यांनी जे वाजपेयीसोबत केलं ते आत्ता मोदींसोबत करू शकत नाहीत.
यासोबतच आज 'विराट हिंदू' म्हणून राजकीय प्रतिमा बनविण्याचा प्रयत्न करित असलेल्या स्वामींनी 1990 ते 2000 च्या दशकात आरएसएसला एक 'दहशतवादी संघटना' म्हणून संबोधले होते. आज त्याच संघटनेचा ते साथीदार असल्याचा, कैवारी असल्याचा दावा करतात.
सन 2000 मध्ये स्वामींनी लिहिले की, 'राष्ट्रीय स्वयंसेवक संघटना ही हळूहळू आपले साम्राज्य वाढवत आहे. हा संघटन विस्तार आणीबाणीच्या काळात केला त्याप्रमाणे नाही, हे काम मोठ्या कौशल्याने सात (7) चेहरे नसलेल्या आरएसएसच्या माणसांकडून केल्या जात आहे, ज्याला 'आरएसएस हायकमांड' म्हटल्या जाते.'
यासोबतच त्यांनी हे सुद्धा म्हटले की, त्यांचं (आरएसएस) धोरण अस आहे की, 'आमच्या सोबत सामील व्हा आणि मुक्ती मिळवा आणि आमचा विरोध कराल तर तुम्हाला आम्ही कोर्टात भेटू. अशाप्रकारच्या खटल्यांच्या मालिकांमुळे, सोबतच समविचारी सहकारी असलेल्या मीडियाच्या माध्यमातून बातम्या पेरण्याच्या प्रवृत्तीमुळे आरएसएसला अपेक्षा आहे की ते विरोधकांचा आवाज दाबू शकतील.'
इतकेच नाही तर भारतीय जनता पार्टी आणि आरएसएस वर बंदी आणावी म्हणून स्वामींनी प्रयत्न सुद्धा केले होते.
हे सर्व बोलत असतानाच स्वामींनी अयोध्या येथील बाबरी मस्जिद पुन्हा बांधायला हवी, असा सल्लाही दिला होता आणि आता ते म्हणतात की, हिंदूंनी बाबरी मस्जिद केस जिंकली ती त्यांच्या युक्तीवादामुळे जिंकलेली आहे.(जे कि साफ खोटे आहे) मुख्य म्हणजे राम जन्मभूमी खटल्याचे सर्व श्रेय हे स्वामींना घ्यायचे होते. तेही त्या लोकांचा अपमान करून, ज्यांनी आपले जीवन पाचशे वर्षापासून आपल्याच असलेल्या वस्तूला (आस्थास्थान) परत मिळवण्यासाठी समर्पित केले होते.
स्वामींच्या विचारात झालेला बदल त्यांनी स्वतःच एका उत्तराद्वारे दाखवून दिलेला आहे. 2018 मध्ये एका मुलाखतीत स्वामीनी दावा केला की, त्यांचे आरएसएस सोबत भूतकाळात द्वेषपूर्ण संबंध/नाते होते. आणि या कटू संबंधांबद्दल त्यांनी आपल्या संघाबद्दलच्या चुकीच्या समजुतीला दोष दिलेला आहे. त्यांना असे वाटायचे की, संघ हा भाजपाला सूक्ष्मरित्या चालवितो. भारतीय जनता पक्षाचे नेते जे काही बोलतात किंवा करतात ते संघाच्या आदेशाने करतात, असा त्यांचा समज होता आणि यातूनच परिणामतः त्यांची असलेली अटलबिहारी वाजपेयी यांच्याबद्दलची नापसंती ही संघाला नापसंत करण्यात उतरली.
त्यांनी या विचारसरणीच्या बदलाबद्दलचे श्रेय एका घटनेला दिले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांचे व्यक्तिमत्त्व 'त्या' घटनेमुळे बदलले आणि डोळे सुद्धा उघडले. ही घटना म्हणजे कांचीचे शंकराचार्य जयेंद्र सरस्वती यांना 11 नोव्हेंबर 2004 रोजी करण्यात आलेली अटक!!! त्यादिवशी दिवाळी होती आणि त्याचदिवशी आठ वर्षाच्या मोठ्या अंतरानंतर काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली होती.
त्यावेळेस शंकराचार्य यांना ओढून अटक करून नेतानाच्या बाहेर आलेल्या चित्रामुळे बर्याच लोकांना धक्का बसला होता आणि त्यातून असा मतप्रवाह निर्माण झाला होता की, हे फक्त पोलिसांच्या अतिरेकी कारवाईचे प्रकरण नसून एखाद्या हिंदू संताचा जाणीवपूर्वक केलेला अपमान आहे. त्या दृश्यावरून असं दिसत होतं की, एक हिंदूविरोधी पक्ष सत्तेत आलेला आहे. स्वामींनी पुढे असेही म्हटले की, त्यांना कधीही स्वप्नात असे वाटले नव्हते की भारतात एखाद्या हिंदू संताला अशा पद्धतीने वागणूक दिली जाईल आणि त्याच घटनेवरून त्यांचे मतपरिवर्तन झाले, असे ते म्हणतात.
खूप दिवसाच्या प्रदीर्घ सुनावण्यांनंतर 2013 मध्ये कांची शंकराचार्य यांना 'त्या' हत्येच्या गुन्ह्यातून निर्दोष मुक्त करण्यात आले होते, ज्यासाठी त्यांना अटक करण्यात आली होती आणि 2018 फेब्रुवारीला त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
स्वामींनी दिलेले हे स्पष्टीकरण आहे. परंतु खरोखरच हे सत्य वाटतं का ? यातून आपल्याला हे लक्षात येतंय का की, हे हिंदू विरोधी असलेले स्वामी, हिंदुत्वाच्या प्रतिमेचे संवर्धक कसे ठरले ? यातून हे लक्षात येतंय का की, आज ते जे काही बोलत आहेत, ते खरोखरच हिंदुत्वाबद्दलचे प्रेम आहे ? की, त्यांना इथे राजकीय संधी दिसत आहे ? म्हणून ते बोलत आहेत किंवा यातून आपल्याला हे लक्षात येतं का की, कशाप्रकारे एक व्यक्ती सोनिया गांधीची मदत घेऊन वाजपेयी सरकार पाडू शकतो ? आणि तो आता हिंदुत्वाचा नायक होऊ शकतो ? बर्याच ठिकाणी स्वामी म्हणतात कि, ते मुळ जनसंघाचे आहेत. ते म्हणतात की, ते जनसंघाचा एक भाग होते. जरी त्यांचे राजीव गांधी यांच्यासोबत निकट संबंध होते किंवा ते सोनिया गांधीकडे वाजपेयी सरकारला पाडण्यासाठी मदत मागायला गेले होते तरी. तसेच बोफोर्स प्रकरणामध्ये त्यांनी राजीव गांधी यांच्या बचावाकरिता जमीन-आसमान एक केले होते. आता ते हे ही म्हणतात की, शंकराचार्य यांना करण्यात आलेल्या अटकेमुळे त्यांच्या विचारधारेत बदल झाला आणि ते 'हिंदूविरोधी वरून विराट हिंदू' बनलेले आहे. तसेच स्वामी दावा करतात की, ते मूळ जनसंघाचे आहेत तर मग त्यांचा हा प्रवास कसा काय आहे? जर ते ओरिजनल हिंदूविरोधी किंवा हिंदुत्वविरोधी नव्हते तर त्यांचे मतपरिवर्तन होण्याकरिता शंकरचार्याना अटक का व्हावी लागली? किंवा असं होतं का की, राजकीय फायदा दिसत होता म्हणून ते हिंदुत्वविरोधी भूमिका घ्यायला लागले होते ? आणि जेव्हा त्यांना पुन्हा जनसंघाच्या विचारधारेचा फायदा दिसायला लागला तेव्हा ते पुन्हा राजकीय संधी घेऊन जनसंघाच्या विचारधारेकडे परत आले?
जे लोक पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांचं मतपरिवर्तन झालं किंवा राजकीय संधीमुळे भाजपात सामील झाले त्यांच्यासाठी हा बदल समजण्यासारखा आहे .राजकारणात कोणीही कायमस्वरूपी मित्र किंवा कायमस्वरूपी शत्रू नसतो आणि हिंदुत्ववाद्यांनी हे समजून घेण्याची गरज आहे.(माझ्यासकट) राजकारण हे विचित्र अशा लोकांसाठीच आहे. परंतु जे हिंदूंच्या होत असलेल्या नरसंहारवादासमोर स्वतःला झोकून देतात आणि संसदेत जातीय हिंसा विधेयकासारखे चुकीचे विधेयक मंजूर करून आणतात. ते अचानक एकेदिवशी उठून त्या सर्व दुष्कुत्यापासून दूर होऊन, स्वतःला 'विराट हिंदू' कसे म्हणू शकतात? याबाबतीत मी दासणा मंदिराचे महंत यति नरसिंहानंद सरस्वती यांच्यासारख्या व्यक्तीबद्दल अधिक सहानुभूती बाळगू शकते. कारण भाजपचे अनेक समर्थक आता असा दावा करू लागले आहेत की, ते कदाचित समाजवादी पक्षाला जवळचे आहेत.
आपण ही एक राजकीय बाजू बाजूला ठेवून बघितले तर आपणास दिसून येते की, त्यांनी संस्कृती रक्षणाचे कार्य जमिनीवर उतरून केले आहे. तो व्यक्ति मुस्लिम अतिरेक्यांनी वेढलेल्या एका छोट्या मंदिराचे रक्षण करतो. अनेक हिंदू तरुणांना हत्येच्या प्रयत्नातून आणि हिंदू मुलींना लव्ह जिहादच्या धोक्यापासून वाचवण्यासाठी प्रयत्न करतो. तो एक कच्चा दुवा/माणूस जरूर असू शकतो परंतु त्याचं हृदय हे बरोबर ठिकाणी आहे.
संधिसाधू ते असतात जे आपले वैयक्तिक हेतू साध्य करण्यासाठी नैतिकता आणि सभ्यता ही वार्याच्या वेगाने फेकून देतात. बर्याच लोकांसाठी ते पूर्णपणे मान्य असेल आणि कदाचित तसे असावे कारण ही वैयक्तिक महत्वाकांक्षा आहे. ही मनाला लागणारी गोष्ट नाही तर खरंतर ती काळजी करणारी गोष्ट असू शकते. परंतु जेव्हा हीच गोष्ट आमच्या हिंदूंच्या बाबतीत येते, तेव्हा बर्याच लोकांनी आमच्यात असलेला राग हा स्वतःच्या फायद्यासाठी किंवा स्वतःला 'हिंदूंचा मसीहा' दाखवण्याच्या कामासाठी हळुवारपणे वापरून घेतलेला आहे. स्वतःच्या फायद्यासाठी ही लोक त्या लोकांसोबत राहतात जी लोक आमच्या डोक्यावर बसून, छाताडावर बसून नाचतात किंवा आमच्या कवट्या फोडून अंगात आणतात.
स्वामींनी बिलकुल तसच केलेलं आहे. स्वामींनी त्या लोकांसोबत हातमिळवणी केली, ज्यांना हिंदूंना नाश करायचे होते. असे स्वामींनी का केले ? तर त्यांना स्वतःचा राजकीय फायदा करून घ्यायचा होता आणि आता ते स्वतःच मार्केटिंग करण्यासाठी स्वतःला 'विराट हिंदू' म्हणून घोषित करतात. का ? तर पुन्हा त्यांना आपल्या राजकीय महत्त्वाकांक्षा पूर्ण करून घ्यायच्या आहेत.
त्यामुळे हे या व्यक्तीचे साधन झालेले आहे, हे आपल्याला समजून घ्यावे लागेल आणि हिंदूंनी स्वतःचे डोळे उघडून कॉफीचा सुगंध घ्यावा आणि खरी कॉफी कोणती? ते ओळखावे, हेच हिंदूसाठी फायद्याचे आहे.
धन्यवाद !!!
पवन
साभार : नूपुर जे. शाह यांच्या इंग्रजी लेखावरून