Monday, November 8, 2021

बीएमसीमध्ये भंगार घोटाळा?? भाग-1


आज-काल 'भंगार' शब्द ऐकला की, एका 'मंत्र्याचाच' चेहरा समोर येतो. पण ही बातमी खरोखरच्या भंगार घोटाळ्या? संबंधातील आहे.

दिवाळीच्या पूर्वी ही बातमी वाचनात आली होती. परंतु दिवाळी मुळे घरी प्रवास करायचा असल्याने वेळ नव्हता. त्यामुळे 'उत्तरप्रदेश-महाराष्ट्र-उत्तरप्रदेश' असा प्रवास आणि दिवाळी सण साजरा केल्यानंतर आत्ता हे आपल्यासमोर मांडतोय.

'हिंदुस्तान टाइम्स' मध्ये 27 ऑक्टोबर 2021 ला भाजपाचे नगरसेवक श्री भालचंद्र शिरसाट यांच्याकडून बीएमसी च्या स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारला 'मुंबई अग्निशमन दला'च्या (एमएफबी) भंगार विक्रीच्या प्रस्तावावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आल्याची बातमी होती. भंगारची किंमत 2.18 कोटी रुपये होती. भाजपाकडून ज्या प्रस्तावावर घोटाळ्याचे आरोप करण्यात आले, त्याला शिवसेना आणि समाजवादी पार्टी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी समर्थन दिलं.

बातमीत दिल्यानुसार, मुंबई अग्निशमन दलाने 'कार्यक्षम नसलेल्या वाहनांना भंगारमध्ये विक्री करण्याकरिता' ठेवलेला प्रस्ताव ज्यावेळी स्थायी समितीच्या बैठकीत चर्चेला आला त्यावेळी भाजपा नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी आरोप केला की, हे भंगार विकत घेण्यासाठी जो व्यक्ती निविदा टाकतोय तो ठेकेदार 'एकच' आहे, त्याचा पत्ता एकच आहे, पण त्याच्या कंपनीचे नाव वेगळं असतं.

हा लिलाव 2017-18 मध्ये आला होता त्याच्यानंतर आता तीन वर्षानंतर हा आलाय आंबेसेडर आणि जीप यासारख्या कार या 25 हजारात विकण्यात आल्या ज्याची भंगारमध्ये विकले तरी किंमत 2 कोटी रुपये होती. तरीही या ठेकेदारांच्या साखळीने हे शक्य करून दाखवले आणि त्यांनी सांगितलं की बीएमसीमध्ये मागच्या 25 वर्षापासून हा गोरखधंदा सुरू आहे.

या आरोपानंतर एक आश्चर्यकारक आणि महत्वपूर्ण गोष्ट अशी झाली की, भाजपाने केलेल्या या आरोपांवर शिवसेनेचे नगरसेवक यशवंत जाधव जे 'स्थायी समितीचे चेअरमन' सुद्धा आहेत ते म्हणाले की, बीजेपी जरी सांगत असेल की, हे 25 वर्षापासून चालू आहे, पण आम्ही सांगतो की, हे 40 वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे. एकाच परिवाराचे सदस्य हे वेगवेगळ्या कंपनीच्या नावाने निविदा टाकतात आणि तेच कॉन्ट्रॅक्ट मिळवतात. इतकेच नव्हे तर दुसर्‍या बाहेरच्या व्यक्तीला त्यामध्ये ते घुसू सुद्धा देत नाही.

हीच परिस्थिती बिल्डिंग पाडण्याकरिता आणि पार्किंगचे ठेके घेण्याकरिता सुद्धा आहे, असंही सांगायला शिवसेनेचे नेते विसरले नाहीत आणि भाजपाद्वारे केल्या गेलेल्या आरोपानंतर, मुंबई अग्निशमन दलाकडून स्थायी समितीकडे आलेला हा प्रस्ताव थांबविण्यात आलेला आहे.  



माझ्यासमोर आता काही प्रश्न उभे झालेले आहेत. ते म्हणजे असे की, भाजपाने केलेले हे आरोप खोटे आहेत का? जर खोटे असते तर भाजपाने 25 वर्षे म्हटल्यावर सत्ताधारी शिवसेनेचे नगरसेवक आणि स्थायी समितीचे अध्यक्ष श्री यशवंत जाधव यांनी  40  वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून हे होतंय आणि हे याच ठिकाणी नाही तर, बिल्डिंग पाडण्याकरिता आणि पार्किंगचे ठेके घेण्याकरिता होत आहे असेही, सांगितल्याचे बातमीत नमूद आहे.

मग जर सत्ताधार्‍यांनाही हे माहिती आहे तर त्यांनी आजपर्यंत यावर कारवाई का  केली नाही ? यामध्ये त्यांची काही मिलीभगत आहे का?  यासारखे प्रश्न उभे राहतात.

हीच परिस्थिती इतके वर्ष देशाच्या बाबतीत होती. की आमचं कोण काय करू शकतं ? म्हणून आम्हाला वाटेल तस आम्ही वागणार. पण 2014 पासून ही परिस्थिती उलट झालेली आहे. मग असाच विचार एकदा यावर्षी येणार्‍या बीएमसीच्या निवडणुकीत मतदारांनी करायला काय हरकत आहे? एकदा करून बघा, कदाचित बदल झाला तर चांगल्या सुविधा मिळतील, ठेकेदारांचे असलेले लागेबांधे आणि त्यातून जनतेच्या कररूपी दिल्या गेलेल्या पैशाचे होणारे नुकसान टाळता येतील आणि आपल्या या मुंबई शहराला आणखी दर्जेदार बनविण्यास मदतही होईल.

विचार करून बघा आणखी तीन-चार महिन्याचा वेळ आहे, निर्णय घ्यायला!!

पटलं तर घ्या!!

लवकरच येतोय याचा दुसरा भाग घेऊन पुढच्या घोटाळ्या? सोबत

धन्यवाद!
पवन

भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...