होय!
वरती वाचलेले शीर्षक हे खरेच भविष्यात शक्य होणार आहे. कारण रेल्वेची सुरक्षा आणि क्षमता वाढविण्यासाठी, सिग्नलिंग व टेलिकम्युनिकेशन यंत्रणेच्या आधुनिकीकरणासाठी पुढील पाच वर्षांत भारतीय रेल्वेने 56,955 कोटी रुपयांच्या गुंतवणूकीची योजना आखलेली आहे.
या महिन्याच्या सुरूवातीला मंत्रिमंडळाने 9 जून रोजी देशातील रेल्वेसाठी 700 एमएचझेड बँडमध्ये 5 एमएचझेड स्पेक्ट्रमचे वाटप करण्याची घोषणा केली होती, जे रेल्वे मार्गावर एलटीई आधारित मोबाईल ट्रेन रेडिओ कम्युनिकेशन आणि प्रगत रेडिओ नेटवर्क उपलब्ध करण्यासाठी वापरला जाईल.
यातील आपल्या ,मुंबईकरिता कॅब बेस्ड कम्युनिकेशन सिस्टम ही ट्रेन आणि इंजिनमध्ये बसविली जाईल. मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट (एमयूटीपी) -3 ए अंतर्गत, अशा प्रकारच्या कॅब आधारित कम्युनिकेशनचे नियोजन केंद्र हे सेंट्रल आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील कम्युनिकेशन बेस्ड ट्रेन कंट्रोल (सीबीटीसी) प्रणाली अंतर्गत 5,928 कोटी रुपये खर्च करून निर्माण केले जाईल. सीबीटीसी या तंत्रज्ञानामुळे ट्रॅकच्या बाजूने असलेल्या सिग्नलच्या खांबांची गरज उरत नाही, कारण ते रेल्वेमध्येच सिग्नलिंग सिस्टम सक्षम करते. या तंत्रज्ञानामुळे रेल्वेगाड्या वेगवान होण्यास आणि दोन गाड्यांमधील समोरासमोरचे अंतर कमी होण्यास मदत होईल.
यासोबतच देशातील रेल्वेच्या या आधुनिकीकरण योजनेत लाँग टर्म इव्होल्यूशन (एलटीई), ऑप्टिकल फायबर सिस्टम, ट्रेन कॉलाईशन अॅव्हॉइडन्स सिस्टम (टीसीएएस), ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग (एबीएस), इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग (ईआय) आणि सेंट्रलाइज्ड ट्रॅफिक कंट्रोल या गोष्टी सुद्धा असेल.
रेल्वेची सुरक्षा आणि सर्वांगीण कार्यक्षम कार्यक्षमता वाढविण्यासाठी अधिक आधुनिक सिग्नलिंग सोल्यूशन्स प्रदान करण्याचा रोडमॅप एक पत्रकार परिषद घेऊन रेल्वे बोर्डाचे सदस्य (पायाभूत सुविधा) संजीव मित्तल आणि मंडळाचे अन्य सदस्य - अरुणा सिंग सदस्य, (दूरसंचार) आणि राहुल अग्रवाल, अतिरिक्त सदस्य (सिग्नल) या सर्वांनी दिला.
ट्रेनच्या कामातील सुरक्षा सुधार करण्यासाठी आणि अतिरिक्त लाइन क्षमता निर्माण करण्याच्या उद्देशाने आता अधिक सिग्नल बँडविड्थ उपलब्ध झाल्यामुळे, पहिल्या टप्प्यातील महत्त्वाच्या मार्गांचा समावेश करून 37,3०० किमीसाठी टीसीएएसला पहिल्या चरणात मान्यता देण्यात आली आहे. टीसीएएस ही एक स्वयंचलित ट्रेन प्रोटेक्शन सिस्टम आहे जी मानवी त्रुटी टाळण्यासाठी लोको पायलटला मदत म्हणून कार्य करते.
देशात सध्या उपलब्ध असलेल्या नेटवर्कवर एबीएससह अधिक गाड्या चालवण्याची क्षमता वाढविण्याची रेल्वेची योजना आहे. ही योजना सद्यस्थितित जास्त गर्दी असलेल्या रेल्वे मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या आणखी वाढविण्यासाठी बनविली गेली आहे. एबीएस आधीच 3,447 कि.मी.वर आहेच, तरीही रेल्वेने मिशन मोडमध्ये सुमारे 15,000 रेल्वे किमी जास्त गर्दी आणि मालवाहतूक असलेल्या मार्गावर स्वयंचलित सिग्नलिंग आणण्याची योजना आखली आहे.
तसेच, सुरू असलेल्या ईआय प्रणालीच्या कामांना यामुळे चालना मिळाली आहे. जी रेल्वेच्या कामात सुरक्षा आणि लवचिकता वाढविण्यासाठी मोठ्या प्रमाणात अवलंबली जात आहे आणि सध्या 2,221 स्थानकांवर वापरली जात आहे. रेल्वेच्या कामकाजाची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढविण्यासाठी रेल्वेने पुढील 3 वर्षांत आणखी 1,550 ईआय सुविधा निर्माण करण्याची योजना आखली आहे.
या पाच वर्षांच्या गुंतवणूकीमध्ये ओएफसी आधारित प्रणालीसह अधिक मार्ग जोडणे हे देखील समाविष्ट असेल. आधीच, रेल्वेचा 92% मार्ग ओएफसीद्वारे कवर केल्या गेलेला आहे, जो रेल्वेच्या अंतर्गत कम्युनिकेशनसाठी वापरला जातो. वाय-फाय सुविधा 6,002 स्थानकांपर्यंत पोहोचलेली आहे, तर 101 आणखी स्थानकावर लावण्यात येणार आहे , त्यापैकी 70% ग्रामीण भागात आहेत.
सुरक्षा सुधारण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा 801 स्थानकांवर लावण्यात आलेली असून, उरलेल्या इतर ठिकाणीही लावण्याचे नियोजन सुरू आहे.
पियूष गोयलजी आपले खूप खूप आभार !!
धन्यवाद!!!
पवन✍️