Wednesday, September 1, 2021

अमेरिका या 'चिल्लर' देशापेक्षा, भारत हा नक्कीच 'कडक शंभरची नोट'!!

भारत आणि तालिबान यांच्यामध्ये काल कतार येथील भारतीय दूतावासात भेट झाल्याची बातमी संध्याकाळी भारतीय परराष्ट्र खात्याने जगाला दिली.
अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर पहिल्यांदाच अशी 'औपचारिक भेट' ही भारतीय राजदूत दीपक मित्तल आणि अफगाणिस्तानमधील तालिबान गटाचा राजकीय नेता शेर मोहम्मद अब्बास यांच्यात घडून आली.
मी इथे असे म्हणणार नाही की, यापूर्वी भारताकडून त्या लोकांसोबत अनौपचारिक चर्चा झालेली नसेल. कारण अशी अनौपचारिक चर्चा झाली नसती तर ज्या ठिकाणावरून अमेरिकेला त्यांच्या नागरिकांना काढणे शक्य होत नव्हते/आजही होत नाहीये. (नागरिकांनाच कशाला ? त्यांनी तर काल आपण हृदयद्रावक फोटोत बघितल्याप्रमाणे प्राण्यांना सुद्धा तिथेच टाकून पळ काढला.) त्याठिकाणी भारताने आपले नागरिक 'डंके की चोट पर' सुरक्षितपणे परत भारतात आणले. तसेच त्या ठिकाणी अल्पसंख्यांक असलेल्या शीख आणि हिंदूंनासुद्धा सुरक्षितपणे भारतात आणून आश्रय दिल्या जात आहे.
कालच्या औपचारिक भेटीचा जो तपशील बाहेर आलेला आहे. त्यामधून इतकेच कळतंय की, अफगाणिस्तानच्या भूमीचा वापर हा भारतात दहशतवाद पसरविण्यासाठी केला जाईल याबाबतीत भारताने चिंता व्यक्त केलेली आहे आणि सोबतच अफगाणिस्तानात अजूनही असलेल्या भारतीयांच्या सुरक्षित परतीसाठी होता.

अफगाणिस्तानमध्ये आज जो तालिबानी गट सध्या सत्तेवर आहे त्यांनी या दोन्ही गोष्टी होऊ देणार नाही आणि भारताने निश्चिंत राहावे, अशी  काल हमी दिलेली आहे आणि यापूर्वी सुद्धा त्यांच्या प्रवक्त्यांनी हे स्पष्ट केलेले आहे की, नवीन आलेलं तालिबान्यांच सरकार हे भारतासोबत चांगले व्यापारिक आणि राजकीय संबंध ठेवण्यास इच्छुक आहे आणि लवकरच भारताशी त्याबाबतीत संपर्क केला जाईल.

या दोन्ही गोष्टी होतीलच यात माझ्या मनात तरी शंका नाही. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सध्या भारतात सत्तेवर असलेलं सरकार आहे. ज्यामध्ये मोदी- शहा आणि अजित डोभाल यांच्यासारखे दूरदृष्टी असणारे आणि देश सुरक्षेसाठी कोणतीही तडजोड न करणारे व्यक्ती सत्तेत आहेत.

याची चुणूक आपल्याला त्याचवेळी आली ज्यावेळी अमेरिका त्यांच्या नागरिकांना तिथून काढू शकत नव्हती आणि भारताचे नागरिक आरामात भारत सरकारने परत आणले होते. यामागे पडद्यामागे होत असलेल्या घडामोडी नक्कीच कारणीभूत असेल.

आत्ताच दोन दिवसापूर्वी ज्येष्ठ अभ्यासक आणि मार्गदर्शक मिलिंददादा यांच्याशी कोरोनाची पहिली लाट मोठ्या प्रमाणात पसरविण्याचे कारस्थान करणारा जमातचा मौलाना साद कुठे असेल? यावर चर्चा सुरू असताना, एक गोष्ट आम्हा दोघांच्याही  मनात आली की, त्यावेळी त्याला अटक न करणे हा एक कुटनीतीचा भाग असू शकतो का? ज्याचा फायदा आज होत असावा?
तसं या सर्व गोष्टी माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरच्या आहेत. पण तरीही या घडत असलेल्या गोष्टींचे निरिक्षण केल्यास थोडीफार लिंक लागत असल्याची जाणीव होते.

जाता जाता इतकेच म्हणेल की, भारतातील विरोधीपक्ष कितीही म्हणत असला की, भारत सरकार अफगाणिस्तानसमोर नांगी टाकून बसलेला आहे!!

तरीही जनतेच्या डोळ्यासमोर सत्य अगदी स्पष्ट आहे की, अमेरिका या 'चिल्लर' देशापेक्षा भारत हा नक्कीच 'कडक शंभरची नोट' म्हणून खमठोकपणे अफगाणिस्तानसमोर उभा आहे!!
बघू या पुढे आणखी काय काय होतंय!!

धन्यवाद!!
पवन✍️


भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...