Wednesday, June 16, 2021

नरेंद्र मोदी : एक कुशल संघटक

आजच्या तरुण वर्गातील राजकारण फॉलो करणार्‍या बर्‍याच युवकांना ही गोष्ट रहस्यकारक वाटते की, कोंग्रेसच्या ईकोसिस्टमच्या मानाने नवख्या असलेल्या भाजपा सारख्या पक्षाला परदेशातून आणि देशातील एनआरआय कडून इतका मोठा आधार कसा मिळतो?

बर्‍याच लोकांना उत्तर ऐकून धक्का बसेल पण ते उत्तर आहे :  नरेंद्र मोदी.

नरेंद्र मोदी यांच्याद्वारे 1980 मध्ये केल्या गेलेल्या पायाभरणीतून आज दिसत असलेला हा पाठिंबा उभा झालेला आहे, आणि त्यांच्यासोबत इतरांचेही तितकेच योगदान आहेच, यात शंकाच नाही. पण नेहमी कोणीतरी एकजण पुढे असावं लागत आणि तो एकजण म्हणजे नरेंद्र मोदी होते, म्हणून त्यांचे नाव घेतोय.

आजपासून 4 दशकापूर्वी भाजपा पक्ष जेव्हा बालवयात होता त्यावेळी, जागतिक मीडियाने या पक्षाला हिंदूत्वाचा अतिरेक करणारा पक्ष जो हिंसा, धमक्या, इत्यादी कृत्य करतो, अशा पद्धतीची प्रतिमा विदेशी जनमाणसात आणि इतकेच नव्हे तर अनिवासी भारतीयांमध्येसुद्धा निर्माण करायला सुरुवात केली होती.

म्हणून त्यावेळच्या भाजपा शीर्ष नेतृत्वास वाटले की, सत्य आणि फॅक्टसच्या आधारे खरी प्रतिमा निर्माण करणे ही काळाची गरज आहे. त्यातून मग त्यांनी तरुण आणि होतकरू अशा बुद्धिमान आरएसएस स्वयंसेवकांची एक छोटी टिम तयार केली ज्यांना या प्रतिमा संवर्धन कार्यक्रमानुसार अमेरिकेला पाठविले गेले.

विशेष म्हणजे या टिमचे नेतृत्त्व तरुण नरेंद्र मोदी (छायाचित्रातील उजवीकडील पहिले) यांनीच केले,  ज्यांनी आधीच त्यांच्या संघ समन्वय आणि तांत्रिक कौशल्यामुळे पक्षात ओळख निर्माण केलेली होती.

मोदींसोबतच अनंत कुमारजी  (फोटोमध्ये डावीकडून चौथे) हे देखील या टिमचा एक भाग होते. ही टिम अनेक वेळा अमेरिकेच्या काही वरिष्ठ राजकारण्यांना भेटायला गेली होती आणि भेटीतुन ते आपली विचारसरणी धार्मिक सिद्धांतांवर आधारित असल्याचे पटवून देत होते आणि पसारविण्यात आलेले सर्व गैरसमज  दूर करीत होते.

याच दरम्यान, मोदींनी एक पाऊल आणखी पुढे टाकले आणि त्यांच्या समन्वयाच्या कौशल्यामुळे त्यांनी एका विचारधारेच्या अनिवासी भारतीयांच्या अनेक गटांना एकत्रित केले आणि त्यांना "स्वयंसेवक संघटना" सुरू करण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पुरविली आणि पुढे चालून तेच गट "ओव्हरसीज फ्रेंड्स ऑफ बीजेपी" म्हणून  विकसित झाले.

या सर्व स्वयंसेवक संघटनांनी (ज्यांचे बिजारोपण मोदी आणि त्यांच्या टीमने केले होते) भाजपाचा संदेश मनामनात पोहोचवला आणि त्याद्वारे सर्वच देशातील अनिवासी भारतीयांमध्ये पक्षाला बळकट आधार मिळाला.

अशाप्रकारे तरुण मोदी आणि त्यांच्या होतकरू टीमने घातलेल्या पायामुळे, आज अनेक दशकांमध्ये भाजपाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आपणास दिसून येते.

बरीच वर्षे संघटक म्हणून श्री नरेंद्र मोदी यांनी कार्य केलेले आहे आणि ते एक कुशल संघटक होते, म्हणूनच हे कार्य त्यांना इतक्या दूर नेता आले.

त्यामुळेच या लेखाला 'नरेंद्र मोदी : एक कुशल संघटक' हेच शीर्षक मला समर्पक वाटते.


No comments:

Post a Comment

भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...