Friday, September 10, 2021
साक्षरतेचे केरळ मॉडेल!
Tuesday, September 7, 2021
तान्हा पोळा! आपले सण, आपली संस्कृती!!
विदर्भात बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी 'तान्हा पोळा' हा साजरा करण्यात येतो. या दिवशी लहान मुले लाकडी नंदीबैल घेऊन घरोघरी जातात. ज्याप्रमाणे बैलपोळ्याच्या दिवशी वर्षभर शेतात राबणार्या बैलांविषयी कृतज्ञता म्हणून 'बैलजोडी' ही घरोघरी नेल्या जाते आणि त्यांची पुजा केली जाते. त्याचप्रमाणे आजच्या दिवशी लहान मुले ही आपला लाकडी 'नंदीबैल' घेऊन घरोघरी जातात. त्यांची (मुलांची) आणि नंदीबैलाची महिला मंडळीकडून मोठ्या श्रद्धेने पुजा केली जाते.
लहानपणी आम्हीसुद्धा नंदीबैल घेऊन घरोघरी जायचो. त्यावेळी इतकी आर्थिक सुबत्ता नसल्याने कोणाच्या घरी आम्हाला खाऊ म्हणून साखर दिली जायची तर कोणाच्या घरी खोबरा गोळी. जास्तच सधन असतील तर 50 पैसे - 1 रुपये वाले चोकलेट आणि त्याहीपेक्षा जास्त सधन असतील तर मग पैसे मिळायचे. 50 पैसे, 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये आणि 10 रुपये सुद्धा मिळायचे. एकदा नंदी बैल घरोघरी नेऊन आणला की, आम्ही सर्व मित्रमंडळी एका ठिकाणी जमून मग कोणाला जास्त कमाई झाली? याची मोजदाद करीत असू. आजच्या काळात प्रत्येकाच्या घरात आर्थिक सुबत्ता असल्याने पैशाचे तितके काही अप्रूप वाटत नाही, तरीही आपल्या प्रथा-परंपरा सुरू राहाव्यात आणि आपल्या पुढील पिढीला त्या कळाव्यात म्हणून आजही आम्ही हे नित्यनेमाने करतो.
मागच्या वर्षीपासून (3 वर्षाचा झाल्यानंतर) माझा मुलगा घराच्या आजूबाजूला नंदीबैल फिरायला न्यायला लागला आहे. जो त्याच्या आजोबांनी (माझे सासरे) घेऊन दिलेला आहे . त्याची आजी(माझी आई) मस्त सजवून देते. अकखा दिवस लगबग असते आणि मुलाच्या मनात उत्कंठा असते (आमच्याही मनात लहानपणी असायची) की, संध्याकाळचे 4 कधी वाजतील आणि कधी पोळ्यात नेऊन आपला नंदीबैल इतरांसमोर उभा करून कसा सुंदर सजविला आहे? याची पोहोचपावती मिळेल आणि मग घरोघरी जाऊन त्याची पुजा करून आणेल.
येश्मितला सध्या इतकं काही कळत नाही पण तरीही त्याच्यात उत्साह असतो की, नंदीबैल आज वर्षातून एकदा चालवायला मिळणार. आज घरोघरी फिरवून आणला की, मग पुन्हा त्याला व्यवस्थित झाकून सज्ज्यावर ठेवल्या जातो. जेणेकरून पुढीलवर्षी पुन्हा वापरता येईल.
असा हा 'तान्हा पोळा' लहान मुलांनासुद्धा नकळतपणे भूतदया आणि शेतात वर्षभर कष्ट करणार्या शेतकर्यांविषयी आणि बैलांविषयी कृतज्ञता शिकवून जातो.
जपा आपले सण, आपली संस्कृती!
धन्यवाद!
पवन✍️
Monday, September 6, 2021
आज पुन्हा एकदा शिक्षक 'दीन' होता!!
लहानपणीपासून शिक्षकदिन म्हटले की, अंगात एक वेगळाच उत्साह संचारायचा. प्रत्येकाची आपली-आपली भूमिका ठरलेली असायची. (त्यातही आपले सर्वात आवडते शिक्षक-शिक्षिका बनण्याची चढाओढ) कोणी मुख्याध्यापक, कोणी चपराशी अशा सर्व प्रकारच्या विविध भूमिका करीत 5 सप्टेंबर या दिवशी पूर्ण शाळेची जबाबदारी ही विद्यार्थी दशेत सर्वजण घ्यायचे.
पण मागील वर्षापासून कोरोनामुळे शाळेत मुलांना बोलविता येत नाही आणि ऑनलाईन सगळे उपक्रम राबवायचे आहेत/राबविल्या जात आहेत. पण ग्रामीण भागात ऑनलाइन नेटवर्कची समस्या आणि सोबतच इतर संसाधने नसल्यामुळे किंवा कमतरता असल्यामुळे फक्त उपक्रम राबवायचे म्हणून या सर्व गोष्टी केल्या जातात.
परंतु विद्यार्थी शाळेत नाहीत तर मग त्या शिक्षकदिनाला अर्थच उरत नाही. कारण, जेव्हा विद्यार्थी शिक्षकांच्या भूमिकेत येतात त्यावेळी त्यांना आपले शिक्षक कशाप्रकारे कोणताही घटक शिकविण्यापूर्वी किती तयारी करतात? याची जाणीव होते, वर्गात विद्यार्थ्यांना शिकविताना शिक्षक सुनियोजित पद्धतीने आपले अध्यापनकार्य कसे पार पाडत असतात?, सोबतच सर्व शाळेची जबाबदारी कशा पद्धतीने सांभाळली जाते? याची जाणीव विद्यार्थ्यांना होते.आणि त्याचाच सकारात्मक प्रभाव हा पूर्ण वर्षभर विद्यार्थ्यांच्या वागण्या-बोलण्यातून जाणवत असतो. ऑनलाइन शिक्षणाचा विरोध मी करतो असं नाही, ऑनलाइन शिक्षणाचा पुरस्कर्ता मी सुद्धा आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी परिस्थितीनुरूप निर्णय घेणे गरजेचे आहे आणि अशा कार्यक्रम प्रसंगी तर भावनांची गरज असते आणि त्यावेळी ऑनलाइनपेक्षा ऑफलाइनच जास्त प्रभावकारी ठरते, असे माझे वैयक्तिक मत आहे.Wednesday, September 1, 2021
अमेरिका या 'चिल्लर' देशापेक्षा, भारत हा नक्कीच 'कडक शंभरची नोट'!!
भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!
रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...
-
अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयने, त्यांच्या अधिकार्यांना धमकावले जात आहे, म्हणून माहिती दिल्यानंतर मुंबई हायकोर्टाने महाराष्ट्र सरकारला नोटीस ...
-
आज पेट्रोल पंपवर पेट्रोल टाकत असताना जेव्हा 108 रुपये देऊन पेट्रोल टाकावं लागलं तेव्हा जीवाचा तिळपापड झाला आणि आपण या सरकारला निवडून देऊन चू...
-
राहुल गांधी सुप्रीम कोर्टात पेगाससवर आपटले, नरेंद्र मोदी जनतेच्या दरबारात पुन्हा झळाळून निघाले. मागील काही दिवसांपासून भारतीय जनता पक्षाचे स...

