Saturday, October 23, 2021

आमच्या योगींचा 'एयरपोर्ट प्रदेश'!!

काल पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी कुशीनगर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. त्यामुळे साडेचार वर्षांपूर्वी माझ्या उत्तरप्रदेशात स्थापन झालेल्या योगीजींच्या सरकारने कशा पद्धतीने उत्तरप्रदेशला, 'एयरपोर्ट प्रदेश' बनविला आहे, हे बघणे किंवा लोकांसमोर मांडणे गरजेचे ठरते.
तर चला सुरुवात करूया!!

2016 मध्ये उत्तरप्रदेशात लखनऊ आणि वाराणसी असे फक्त 02 'कार्यान्वित' असलेले विमानतळ होते. आज कार्यान्वित असलेले 09 विमानतळ आहेत. त्यातले 3  हे आंतरराष्ट्रीय आणि 6 हे राष्ट्रीय आहेत.


प्रयागराज विमानतळ :

प्रयागराज  विमानतळाचं नवीन टर्मिनल हे 2019 पूर्ण करून जनतेला समर्पित झालं. आजघडीला याठिकाणी दैनंदिन पद्धतीने 11 विमान ये-जा करतात. आत्ताच काही दिवसांपूर्वी त्यांनी 12000  विमान उड्डाण पूर्ण करण्याच्या विक्रमाला गवसणी घातलेली आहे आणि नवीन टर्मिनल बनल्यानंतर एक मिलियन प्रवाशांनी येथून ये-जा केलेली आहे.

गोरखपूर विमानतळ : 

गोरखपूर विमानतळाला सुद्धा नवीन टर्मिनल बिल्डिंग मिळालेली आहे. तिचे उद्घाटन सप्टेंबर 2018 मध्ये करण्यात आलं आणि फेज -1,-2  चा विस्तारीत आराखडा आता पूर्ण झालेला आहे. सध्याच्या घडीला उत्तर भारतातील सर्वात गतीने प्रगती करत असलेले हे विमानतळ आहे. काही वर्षापूर्वी इथून फक्त एक विमान उड्डाण घेत होते, आजघडीला दैनंदिन पद्धतीने 12 विमान ये-जा करतात.

कानपूर विमानतळ :

सध्याच्या घडीला कानपूर विमानतळावरील नवीन टर्मिनल विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अनेक विमानांचे नवीन उड्डाण मार्ग या ठिकाणावरून वाढवण्यात आल्याने दैनंदिन विमानांची संख्या वाढलेली आहे. नवीन टर्मिनलचे विस्तारकार्य हे मार्च 2022 पर्यंत पूर्ण होण्याचे अपेक्षित आहे.


हिंडन विमानतळ :

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च 2019 मध्ये हिंडन विमानतळाच्या नवीन बिल्डिंग टर्मिनलचे उद्घाटन केले होते आणि तेव्हापासूनच आणखी काही विमानांचे नवीन उड्डाण मार्ग इथून सुरू केलेले आहे. एनसीआर विभागातले  कार्यरत असलेले हे दुसरे विमानतळ आहे. या ठिकाणाहून आजघडीला 8 शहरांमध्ये जाण्यासाठी विमानप्रवास सोय उपलब्ध आहे.

बरेली विमानतळ :

नवीन सिव्हिल टर्मिनल हे 2019 मध्ये उद्घाटन करण्यात आलं होतं आणि या वर्षीच्या मार्च महिन्यात पहिल्या व्यावसायिक विमानाने येथून उड्डाण घेतले. आजघडीला दिल्ली, मुंबई, लखनऊ आणि इतरही अनेक ठिकाणांवर जाण्यासाठी बरेली विमानतळावरून विमानप्रवास सोय उपलब्ध आहे. हे विमानतळ राज्यातील आठवे कार्यरत असलेले विमानतळ ठरले आहे.

कुशीनगर विमानतळ :

ज्याचे उद्घाटन काल पंतप्रधान मोदींनी केले. उत्तरप्रदेशातील हे तिसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ठरलेले आहे व सर्व कार्यरत विमानतळामध्ये नवव्या स्थानावर आहे. या विमानतळामुळे 'बुद्धिस्ट टुरिझम'ला मोठ्या प्रमाणात चालना मिळेल आणि पूर्वांचलच्या विकासासाठी यातून मदत सुद्धा होईल.  3.2 किलोमीटरच्या धावपट्टीसोबत हे विमानतळ उत्तरप्रदेशातील सर्वात लांब धावपट्टी असलेले विमानतळ झालेले आहे.

लखनऊ विमानतळ :

लखनऊ ही राज्याची राजधानी असल्यामुळे भविष्यातील गरजेच्या हिशोबाने या विमानतळाचा विस्तार करण्यात आलेला आहे. त्याठिकाणी आता टी-3  टर्मिनल बनविल्या जात आहे. ज्यासाठी 1383  कोटी रुपये खर्च करून एक मिलियन चौरस फुट जागेवर त्याची बांधणी केल्या जाणार आहे. 2022 पर्यंत ते काम पूर्ण करण्याचं ध्येय ठेवण्यात आलेला आहे आणि ते काम पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणावरून एका वर्षात 10 मिलियन प्रवासी  ये-जा करू शकतील, इतकी याची क्षमता होणार आहे.

वाराणसी विमानतळ :

राज्यातील दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ ज्याचा 'अत्याधुनिक टर्मिनल' सोबत विकास करण्यात आलेला आहे आणि 2024 पर्यंत हे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा आहे.  ते पूर्ण झाल्यानंतर 4.5 मिलियन प्रवासी हे एका वर्षात येथून ये-जा करू शकतील. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे, विमानतळाला शहराशी जोडणार्‍या नवीन महामार्गाचे आत्ताच काही दिवसांपूर्वी उद्घाटन झालेले आहे.

यासोबतच 3 नवीन 'नो फ्रिल्स विमानतळ' लवकरच उत्तरप्रदेशच्या विमानतळांच्या यादीत जोडल्या जातील. कारण या विमातळांच्या टर्मिनल बिल्डिंगचे व धावपट्टीचे बांधकाम जवळपास पूर्ण झालेले आहे.  लवकरच त्याचे उद्घाटन सुद्धा होईल.

फोटो -1  आजमगड 
फोटो- 2 अलीगड 
फोटो - 3 श्रावस्ती


जाता-जाता इतकच म्हणेल की,  साडेचार वर्षांपूर्वी योगीजी आमच्या उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून केंद्रातून राज्यात आले आणि आजघडीला त्यांनी ज्या राज्याची इतर राज्यातील लोक 'मागासलेला प्रदेश' म्हणून खिल्ली उडवत होते, त्याच राज्याला आज विमानतळांच्या बाबतीत तरी मोठे नेटवर्क योगीजींच्या महत्प्रयासाने मिळालेले आहे आणि त्याचा आम्हा उत्तरप्रदेशवासियांना गर्व सुद्धा आहे. म्हणूनच आज छाती ठोकून आम्ही तुमच्यासमोर हे सर्व काम दाखवू शकतो.

ज्याप्रमाणे केंद्रातील कामासाठी 'मोदी है तो मुमकिन है' असे आपण म्हणतो, तसच आता मला आमच्या उत्तर प्रदेशातील कामासाठी 'योगी है तो मुमकिन है' असंच म्हणावं लागेल. मी प्रभु श्रीरामचरणी प्रार्थना करतो की, तुम्हाला सुद्धा, तुम्हाला म्हणजे तुमच्या राज्याला सुद्धा योगीजी सारखाच धडाकेबाज मुख्यमंत्री मिळो आणि तुमच्या राज्याचा सुद्धा आमच्या उत्तरप्रदेश पेक्षा जास्त गतीने विकास होवो!

धन्यवाद!

पवन

No comments:

Post a Comment

भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...