Sunday, June 13, 2021

कोविशिल्ड, कोव्हाक्सिन, स्पुतनिक-व्ही, भारत आणि विरोधीपक्ष!!!


भारतात सध्याच्या घडीला सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेत एकूण 3 लसींचा वापर करण्यात येत आहे.

त्यातील दोन या भारतीय बनावटीच्या आहेत तर एक  स्पुतनिक-व्ही ही रशियातून आयात केलेली आहे.

देशात विरोधकांनी आवई उठवली की, लोकांना चांगली लस मिळावी म्हणून विदेशातल्या लसीना परवानगी द्या. परंतु आता ज्यावेळी विदेशातील लस भारतात आली, त्यावेळी भारतातील लोकांकडून तिला एकदम थंड प्रतिसाद मिळालेला, दिसून येत आहे. 


12 जूनपर्यंत भारतात तिन्ही लसींचे मिळून, एकूण 24.88 कोटी डोज देण्यात आलेले आहेत.

त्यातील 14 मे 2021 पासून भारतात स्पुतनिक-व्ही च्या लसिकरणाचा कार्यक्रम सुरु झाल्यानंतर  22 दिवसात फक्त, 24, 716 लोकांनी स्पुतनिक-व्ही ही लस घेतलेली आहे.

भारत सरकार या लसीची खरेदी व वितरण करत नाही, ज्याप्रमाणे ते कोव्हाक्सिन आणि कोविशिल्डचे करते.

ही लस डॉक्टर रेड्डीज लॅबोरेटरी यांच्या माध्यमातून फक्त प्रायव्हेट हॉस्पिटलमधून देण्यात येते. कारण तिला -20° तापमानामध्ये साठवणूक करावी लागते.  आतापर्यंत भारतात 32.10 लाख लस, ही आयात करण्यात आलेली आहे आणि यावर्षी ऑगस्ट महिन्यापासून या लसीचे उत्पादन हे भारतातच केले जाणार आहे. जवळपास  850 मिलियन डोज तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेले आहे, त्यामुळे जगात पाठवली जाणारी स्पुतनिक -व्ही लस, ही 65 ते 70 टक्के भारतात बनवलेली असेल.

सध्याच्या घडीला ही लस रशियाकडूनच आपल्याला पाठवल्या जात आहे. 


या तिन्ही लसींची परिणामकारकता

आणखी एक गोष्ट म्हणजे, या तीनही लसींच्या परिणामकारकतेमध्ये खूप जास्त प्रमाणात फरक आढळून आलेला नाही.

कोविड 19 च्या विरुद्ध स्पुटनिक 91.6% परिणामकारक दिसून आली, तर कोव्हाक्सिन 78 ते 81% आणि कोविशिल्ड 70 टक्केपेक्षा जास्त आणि जर जास्त आठवडे उशीरा घेतली तर 90% पर्यंत तिची परिणामकारकता दिसून आलेली आहे. 



किंमत :

सध्याच्या घडीला कोविशिल्ड आणि कोव्हाक्सिन हे भारत सरकार मोफत सर्व नागरिकांना पुरवत आहे आणि ज्यांना याच लसी खासगी रुग्णालयातून घ्यायच्या आहेत, त्यासाठी सरकारने किंमत ठरवून दिलेली आहे.

कोविशिल्ड- 780  प्रती डोज,

कोव्हाक्सिन - 1410 

स्पुतनिक  व्ही - 1145 





विचार केला तर, सध्याच्या घडीला स्पुतनिक-व्ही ही भारतात सर्वात स्वस्त लस आहे, तरीही लोकांचा कल ती लस घेण्याकडे का कमी आहे? याचा विचार होणे आवश्यक आहे. 


या तिन्ही लसीचे असलेले नकारात्मक परिणाम खालीलप्रमाणे:

लांसेटने फेब्रूवारी 2021 मध्ये प्रकाशित केलेल्या स्पुतनिक-व्ही  च्या अभ्यासानुसार-

डोकेदुखी 

थकवा 

इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे

तापाची लक्षणे. 

कोव्हाक्सिनच्या फॅक्टशीटनुसार - 

इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे

लालसरपणा आणि सूज येणे

ताप

थंडी किंवा गर्मी वाटणे

अंगदुखी

मळमळणे किंवा उलटी येणे

खाज येणे

डोकेदुखी 


कोविशिल्डचे असलेले साईड इफेक्ट जवळपास कोव्हाक्सिन सारखेच आहेत. ज्यामध्ये,

इंजेक्शनच्या ठिकाणी दुखणे

लालसरपणा

कमी जास्त प्रमाणात ताप

घाबरल्यासारखे वाटणे

अंगदुखी 



वरील सर्व माहितीचा जर अभ्यास केला तर असे दिसून येते की, जवळपास या तिन्ही लसींची कोविड-19 च्या विरोधात असलेली परिणामकारकता ही कमी जास्त प्रमाणात सारखीच आहे, किमतीचा विचार केला तर सर्वात कमी किंमत ही विदेशी स्पुतनिक - व्ही या लसीची आहे आणि असलेल्या साईड इफेक्टचा विचार केला तर जवळपास कमीजास्त प्रमाणात तिन्ही लसींचे सारखेच आहेत.

त्यामुळे निदान भारतात तरी, जनतेकडून भारतीय लसीलाच पसंती देण्यात येत आहे, असे दिसून येते किंवा विदेशी लस घेण्यासाठी स्वतः जवळचे पैसे खर्च करण्याची इच्छा नसेल, असेही म्हणता येईल.

मग जर याचा विचार केला तर अजूनही राहुल गांधी यांच्या नेतृत्वात विरोधी पक्ष 'फायजर', 'मोडेर्ना' यासारख्या लसींना परवानगी द्या, म्हणून मागणी करत आहे, जिची किंमत यूएस मध्ये सध्याघडीला 1423 रुपये प्रतीडोज आहे. भारतात 150 रुपये प्रती डोज ने द्यावी म्हणून जुलै पासून भारत सरकार बोलणी सुरू करणार आहे.  



तरीही तिची किंमत  या सध्याघडीला भारतात उपलब्ध असलेल्या 3 लसींपेक्षा जास्तच राहील, इतके लक्षात येत आहे.  मग विरोधीपक्ष भारतातल्या लसींना जनतेकडून विदेशी लसीपेक्षा चांगला प्रतिसाद मिळत असतानाही, त्यांची मागणी का करत आहे? याचा ज्याने त्याने विचार करावा.


धन्यवाद!!!

पवन ✍️



No comments:

Post a Comment

भारत 1989-2014 आणि नंतर - आमुलाग्र बदल!!

रविवार विशेष!! आजचा लेख जरा जास्तच मोठा आहे. पण भारताचा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ समजून घ्यायचा असेल, तर आवर्जून वाचाच. भारतात नेहमीच...