भाजपा उमेदवार चंदना बाउरी बंगालच्या सालतोरा या मतदारसंघातून आज 4145 मतांनी निवडून आलेल्या आहेत. त्यांचा विजय यासाठी महत्त्वाचा आहे. कारण, त्यांच्याजवळ असलेली संपत्ती ही रुपये 31,985, सोबत 3 बकऱ्या 3 गाई आणि 1 झोपडी आहे.
चंदना यांना 3 अपत्ये आहेत. त्यात 2 मुली आणि 1 मुलगा आहे. त्यांचे पती हे मनरेगा योजनेत मिस्त्री काम करतात. तसेच चंदना यासुद्धा मनरेगाच्या मजुरीवर जातात आणि त्यातुन दोघांचे मिळून 350 रुपये रोज त्यांना मिळतो. त्या पैशातूनच त्यांचे घर चालते परंतु पावसाळ्याच्या दिवसात ते सुद्धा मिळत नाही आणि आर्थिक अडचण असते.
आता सध्या पीएम ग्रामीण आवास योजनेअंतर्गत त्यांच्या पक्क्या घराचे काम सुरू आहे.
त्यांच्या गावात जाण्यासाठी पक्का रस्ता सुद्धा नाही. निवडणुकीच्या काळात बीजेपी कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरातील राशन आणि बाकी सर्व गरजांची पूर्तता केलेली आहे, म्हणून त्यांना प्रचार करता आला.
चंदना यांचा मुकाबला हा करोडपती असलेल्या तृणमूल पक्षाचे उमेदवार संतोष कुमार मंडल यांच्यासोबत होता.
ज्या जागेवर आज चंदना जिंकून आलेल्या आहेत त्या जागेवर 2011 आणि 2016 अशा दोन्ही वेळेस तृणमूल काँग्रेसचे उमेदवार निवडून आलेले आहेत.
यावरून तुम्ही समजू शकता की चंदना बावरी यांचा विजय हा त्यांच्यासाठी किती महत्त्वाचा आहे.
बंगाल जरी आपण हरलेलो असलो तरी, बंगालमध्ये चांगले नेते निवडून आपण आलेले आहेत.
त्यांना आणि त्यांच्यासारख्या अनेक भाजपा कार्यकर्त्यांना भविष्यासाठी हार्दिक शुभेच्छा.
जय श्रीराम!!!!!
पवन.
No comments:
Post a Comment