भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष वनथी श्रीनिवासन यांनी अतीतटीच्या ठरलेल्या कोइंबतूर साउथ या मतदार संघातील लढत 1728 मतांनी जिंकलेली आहे. त्यांना 53,209 मते मिळालेली आहे. तर कमल हसन यांना 51,481 मते मिळालेली आहेत.
2021 मध्ये जवळपास 1.75 लाख मतदार संख्या असलेल्या या मतदारसंघातून सर्वप्रथम अभिनेता आणि मक्कल निधी मय्यम या पक्षाचे संस्थापक श्री कमल हसन यांनी इथून निवडणूक लढविण्याची घोषणा केली आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षाने वनथी श्रीनिवासन यांना तिकीट दिले आणि सोबतच भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तामिळनाडूचे कार्यकारी अध्यक्ष मयुरा जयकुमार यांनी सुद्धा याच मतदारसंघातून लढण्याची घोषणा केली. त्यामुळे ही लढत चुरशीची ठरली होती.
आज सकाळी मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला कमल हसन हे सर्वात पुढे होते. परंतु दुपार होता होता काँग्रेसचे उमेदवार हे पुढे आले. परंतु मतमोजणी पूर्ण होता होता श्रीमती वनथी श्रीनिवासन ह्या 1728 मतांनी विजयी घोषित झाल्या.
यापूर्वी 2011 आणि 2016 ला एआयडीएमके या पक्षाच्या ताब्यात हा मतदार संघ होता.
वनथी श्रीनिवासन यांची निवडणूक लढवण्याची तिसरी वेळ होती. 2016 च्या निवडणुकीत सुद्धा त्यांनी याच मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्या तिसऱ्या क्रमांकावर राहिल्या होत्या.
वनथी या पेशाने वकील आहेत. 1987 मध्ये त्या एबीव्हीपी च्या राज्य संयुक्त सचिव होत्या. एबीव्हीपी मध्ये कार्य केल्यानंतर त्या मुख्य राजकारणाच्या प्रवाहात आल्या. 2004 ते 2009 या कालावधीत त्या भाजपा महिला मोर्चा तमिळनाडू च्या प्रदेश महासचिव होत्या.
मागच्याच वर्षी तामिळनाडू निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांना तमिळनाडू भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्ष पदावरुन बढती देऊन राष्ट्रीय राजकारणात भाजपा महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा मान देण्यात आला आणि आज त्यांची ही झालेली निवड त्यांनी सार्थ करून दाखवलेली आहे. भाजपामध्ये येण्यापूर्वी त्यांनी एबीव्हीपी मधून आपल्या कार्यास सुरुवात केली आणि आज त्यांनी सर्वांना पाणी पाजले.
त्यांना आयुष्यातील पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा.
No comments:
Post a Comment