लेखाचे 'शीर्षक' वाचून जरा अवाक झाले असाल तर त्याचे कारण पुढे दिलेले आहे. वाचा!!
दोन दिवसांपूर्वी बातमी आली की, श्री राहुलजी गांधी यांनी त्यांच्याच पक्षातील काही सहकार्यांना-पत्रकारांना आणि त्यांना अडचणीच्या वाटणार्या, अशा जवळपास 50 लोकांना त्यांनी ट्वीटरवर अनफॉलो केलेले आहे. आपल्या देशाच्या राज्यघटनेने प्रत्येकाला आपले मत, 'संविधानिक भाषेत' मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, मग ते विरोधी मत असेल तरीही, ज्याला 'लोकशाहीचे ठेकेदार' हे 'फ्रीडम ऑफ स्पीच किंवा फ्रिडम ऑफ एक्स्प्रेशन' म्हणतात. परंतु त्याचाच गळा ते रोज दाबून टाकत असतात, याच काही 'लोकशाहीच्या ठेकेदारांपैकी' एक असलेले, श्री राहुलजी गांधी यांनीही यावेळी असाच लोकशाहीच्या या मूल्यांचा गळा दाबलेला आहे.
यातूनच आपल्याला असेही लक्षात येते की, श्री राहुलजी गांधी यांची प्रगल्भता, सहनशक्ती व खिलाडूवृत्ती कितपत आहे. ते नेहमी आरोप करतात की, देशाचे प्रधानमंत्री हे विरोधी पक्षाला किंवा विरोधी विचारांना थारा देत नाहीत. परंतु , या घडलेल्या घटनेचे जर उदाहरण घेतले तर त्यांच्या या प्रश्नाचे उत्तर आपल्याला सहज मिळेल. कारण राहुलजी यांनी जे केले, त्याच्याउलट देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांचे आहे.
माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर लक्षात आले की, प्रधानमंत्री मोदीजी म्हणजेच त्यांचे ट्विटर हँडल हे बऱ्याच विरोधी पक्षातील नेत्यांना तसेच पूर्वी त्यांच्या पक्षात होते किंवा एनडीएमध्ये होते, पण आता पक्ष किंवा एनडीए सोडून गेलेले आहेत अशा लोकांना, यासोबतच काही व्यक्ती अशाही आहेत ज्या देशातील घटनात्मक पदावर बसलेल्या आहेत, तरी सुद्धा प्रधानमंत्री यांच्यावर विखारी भाषेत टीका टिप्पणी करतात, तरी सुद्धा प्रधानमंत्री त्यांना आजही फॉलो करतात, यावरूनच त्यांची प्रगल्भता दिसून येते. कारण आपण 'भारत' देशात राहतो जिथे 'लोकशाही' आहे.
चला तर मग आता नरेंद्र मोदी हे कोणकोणत्या विरोधी पक्षातील लोकांना फॉलो करतात ते बघुया!!
सुरुवात मोदीजीँना रात्रंदिवस पाणी पिऊन पिऊन कोसणाऱ्या श्री राहुलजी गांधी यांच्यापासूनच करतो. कारण, त्यांना सुद्धा पंतप्रधान मोदीजी फॉलो करतात, त्यांच्यासोबतच काँग्रेसमधील दिवंगत नेते आणि कट्टर विरोधक मानले जाणारे श्री अहमद पटेल, आरपीएन सिंह, अभिषेक मनु सिंघवी, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, रणदीप सुरजेवाला, दिग्विजय सिंग, शशी थरुर, अजय माकन, दिपेंद्रसिंह हुड्डा, कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यासोबत अनेक काँग्रेस नेत्यांना ते फॉलो करतात.
तसेच त्यांच्यावर रात्रंदिवस हल्लाबोल करत राहणारे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांचे वडील माजी मुख्यमंत्री श्री लालूप्रसाद यादव, यांच्यासोबत कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनाही ते फॉलो करतात.
देशातील सर्व मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ते फॉलो करतात. त्यामध्ये घटनात्मक पदावर बसून मोदींचा रोज दुस्वास करणाऱ्या ममता बॅनर्जी, यापूर्वी देशाच्या पंतप्रधानांना 'खोटारडा आणि पागल' म्हणून पोस्ट करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया सुद्धा येतात.
यासह दररोज उठून सरकारला आणि पर्यायाने मोदींना दुषणे देणाऱ्या विरोधी पक्षातील नेते, ज्यामध्ये जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीडीपीच्या नेत्या महबूबा मुफ्ती, शिरोमणी अकाली दलाच्या नेत्या आणि पूर्व केंद्रीय मंत्री हर मिसरत कौर बादलही येतात ज्यांनी मागील वर्षी राजीनामा देऊन सरकार आणि एनडीए मधून काढता पाय घेतला, जनता दल युनायटेडचे माजी नेते शरद यादव, यांच्यासारखे अनेक नेते आहेत, जे पूर्वी सरकारमध्ये किंवा एनडीएमध्ये होते आणि आता सोडून गेलेले आहेत, त्यांना अजूनही मोदीजी फॉलो करतात.
इतकेच कशाला, स्वतः मोदींना शिव्याशाप करून भाजपा सोडून विरोधी पक्षात गेलेले नवज्योत सिंग सिद्धू, कीर्ती आझाद, प्रदयोत बोरा, उदित राज जे दररोज ट्विटरवर मोदींच्या नावे बालिश आरोप करीत राहतात, त्यांना ते आजही फॉलो करतात.
शेवटी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याची असलेली महाराष्ट्रातील सत्ता, ज्या ठाकरेंमुळे गेली, त्या 'ठाकरेंच्या पोराला/नातवाला' म्हणजेच 'आदित्य ठाकरे' यांना आजही मोदी फॉलो करतात, त्यांच्यासोबतच 'ममता दीदीचे भाचे' असलेले तृणमूल काँग्रेसचे 'अभिषेक बॅनर्जी' यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला, विरोधात असूनही आणि जिव्हारी लागण्यासारखे कार्य केल्यानंतरही त्यांना अनफॉलो केलेले नाही.
यामुळेच मला लेखाचे शीर्षक हे 'प्रधानमंत्री नरेंद्र मोदी: एक नीलकंठ' असे समर्पक वाटते!
जाता जाता शेवटी एक गोष्ट नमूद करतोय, सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 2014 मध्ये जेव्हा हे सरकार आले होते, त्यावेळी जवळपास 100 वैयक्तिक खात्यांना ट्वीटरवर अनब्लॉक करण्यात आले होते, ज्यांना 2014 पर्यंत असलेल्या सरकारने ब्लॉक करून ठेवलेले होते. यावरूनच लक्षात येते की, 'सहनशीलता आणि विरोधी विचार ऐकण्याची खिलाडूवृत्ती' ही आधिपासूनच नाही.
फक्त आज राहुलजी गांधी यांनी केलेल्या कृतीमुळे हे सगळे जनतेसमोर आले, त्यासाठी धन्यवाद राहुलजी!!
धन्यवाद!!!
पवन!!!
No comments:
Post a Comment