भारत सरकारने दिनांक 3 जून रोजी म्हणजेच आज सांगितले की, देशात सर्व जनतेचे लवकरात लवकर लसीकरण व्हावे म्हणून 'स्वदेशी' कंपनी असलेली हैदराबाद मधील बायोलॉजिकल-ई कडून त्यांनी 30 कोटी कोविड-19 ची लस घेण्याची सर्व तयारी पूर्ण केलेली आहे आणि त्यांनी डोज राखून ठेवावे, म्हणून भारत सरकार या कंपनीला 1500 कोटी रुपये देणार आहे. कोविशिल्ड आणि कोवाक्सिन नंतर ही तीसरी भारतीय लस बाजारात आलेली असेल.
या लसीची पहिली आणि दूसरी चाचणी ही यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे आणि आता तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
बायोलॉजिकल-ई यांनी बनवलेली लस ही आरबीडी प्रोटीन सब युनिट आहे आणि पुढील काही महिन्यात म्हणजेच ऑगस्ट ते सप्टेंबर 2021 पासून याचे प्रोडक्शन आणि स्टॉक करणे सुरु होणार आहे.
बायोलॉजिकल-ई यांनी पाठविलेल्या प्रस्तावाची तपासणी ही लस संशोधन आणि निर्मितीसाठी तयार करण्यात आलेला गट नॅशनल ग्रुप ऑन वाक्सिन अडमिनिस्ट्रेशन फॉर कोविड 19 (एनईजीव्हीएसी) यांनी केली आणि सर्व खात्री केल्यानंतर त्यांनीच मंजुरीसाठी शिफारस सुद्धा केलेली आहे.
बायोलॉजिकल-ई ला, ही लस बनवण्यासाठी भारत सरकारद्वारे त्याच्या लॅबोरेटरी संशोधनाच्या पूर्वीपासून तर आत्ता तिसऱ्या टप्प्यापर्यंत सर्व सहकार्य पुरविण्यात आलेले आहे. त्यांना संशोधनास मदत म्हणून सुरुवातीच्या काळात 100 कोटी रुपये देण्यात आलेले होते आणि इतकेच नाही तर त्यासोबतच प्राण्यांवर करायच्या सर्व प्रयोगासाठी, सर्व प्रकारच्या संशोधनात आणि अभ्यासात 'रिसर्च इंस्टिट्यूट ट्रन्स्लेशनल हेल्थ सायन्स टेक्नॉलॉजी इंस्टिट्यूट' (टीएचएसटीआय) फरीदाबाद यांच्या माध्यमातून सरकारने सहकार्य केले.
हे सर्व भारत सरकारच्या 'मिशन कोविड सुरक्षा - भारतीय कोविड -19 लस विकास मिशन' या अंतर्गत करण्यात येत आहे. जी भारतात कोविड-19 लस विकासाच्या प्रयत्नांना बळकटी व गती देण्यासाठी सुरू करण्यात आलेली एक योजना आहे आणि तिचा समावेश आत्मनिर्भर भारत-3 मध्ये करण्यात आलेला आहे.
'नागरिकांपर्यंत एक सुरक्षित, कार्यक्षम, परवडणारी व सर्वाना घेता येईल अशी, कोविड-19 लस मिळविणे' हे या मिशनचे उद्दीष्ट आहे. यासोबतच कमीत कमी पाच ते सहा कोविड-19 लस बनविन्यात रस घेणार्या कंपन्याना सहकार्य करणे सुद्धा सद्य परिस्थितीत सुरु आहे.
यापैकी काही कंपन्या आता सरकारकडून परवानगी घेणे आणि लस सार्वजनिक आरोग्य यंत्रणेमार्फत जनतेसाठी खुली करण्याच्या जवळ आलेल्या आहेत. या मिशनमुळे केवळ कोविड-19 लस विकासाच्या प्रयत्नांना गती दिलेली नाही तर सुरुवातीपासून शेवटपर्यंत (एंड टू एंड) लस आपल्याच देशात कशी बनवता येईल? याच्या इकोसिस्टमला चालना दिलेली आहे. जी इकोसिस्टम सध्या चालू असलेल्या कोविड-19 लसीच्या संशोधनासाठी आणि भविष्यातील इतरही आजारावरील लसींच्या संशोधन व विकासात्मक कामांसाठी उपलब्ध असेल. म्हणजेच मोदीजींच्या शब्दात, 'आत्मनिर्भर भारत' भविष्यातील गोष्टींसाठी आजच झालेला असेल.
मला तरी असे वाटते की, भारतातील बऱ्याच लोकांना अजूनही या तिसऱ्या भारतीय लसीबद्दल क्वचितच माहिती असेल, म्हणूनच या लेखाचे शीर्षक "नरेंद्र मोदींची खासियत : सुमडीत कुमडी!" असे दिलेले आहे!
धन्यवाद!!!
पवन!!!
No comments:
Post a Comment